

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. वस्तूंबाबत निष्काळजी राहू नका.
वृषभ : इतरांना काही करावयास भाग पाडू नका, जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडी-निवडी, गरजांचा विचार करा, त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल.
मिथुन : पालकांचे आरोग्य हा चिंतेचा विषय असेल. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल.
कर्क : आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. निकटच्या सहकाऱ्यांशी मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल.
सिंह : काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा.
कन्या : प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे थकून जाल. धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य तुम्ही शिकू शकता.
तूळ : वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. मनोरंजनासाठी चांगला दिवस.
वृश्चिक : दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. परिस्थितीपासून दूर पळू नका. येनकेनप्रकारे तुम्हाला सामना करावाच लागेल.
धनु : नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. प्रेमप्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा.
मकर : विजयामुळे अतीव आनंद मिळेल. मित्रांसमवेत आनंद साजरा करा. तुमचे धन बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकते.
कुंभ : आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर करू शकता. मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे.
मीन : इंटरेस्टिंग वाचन करून मनाला, विचारांना खाद्य पुरवा. आज आर्थिक हानी होऊ शकते. संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो.