

मेष : आज तुम्हाला भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. भूतकाळातील गोष्टींचा विचार करीत बसू नका.
वृषभ : गुंतवणूक करणे टाळा. एखाद्या सोहळ्याला गेलात तर व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल.
मिथुन : शांत राहा, तणावमुक्त राहाल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. जोडीदारासोबत ताळमेळ साधा.
कर्क : सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. विना कुणाच्या मदतीने धन कमवाल. आनंद देतील अशा गोष्टी करा.
सिंह : गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अथवा कुठल्या कारणास्तव रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि दिवस खराब कराल.
कन्या : स्वतः आर्थिक दबावात येऊ शकता. तथापि, स्थिती लवकरच सुधारेल. जोडीदारासोबत योग्य तो ताळमेळ साधा.
तूळ : पालकांसोबत आनंद वाटा. एकटेपणा आणि उदासीनतेच्या भावनेमुळे दडपणाखाली असलेल्या पालकांना थोडे बरे वाटेल.
वृश्चिक : सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे योजना राबविण्यात अडचणी निर्माण होतील.
धनु : अनपेक्षित लाभदृष्टिपथात असतील. परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका.
मकर : कुटुंबासोबत पिकनिक करा. त्यामुळे कुटुंबीयांना आणि मुलांच्या नीरस आयुष्यात घटकाभर मोकळीक मिळेल.
कुंभ : तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस.
मीन : प्रेमप्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईकांकडून आनंदवार्ता मिळेल.