

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आज नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे; परंतु घाईगडबडीत कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : व्यवसायात भागीदारांचे उत्तम सहकार्य लाभेल. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे मानसिक शांतता लाभेल. कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल.
मिथुन : जुन्या वादांमधून आज सुटका होऊ शकते. आरोग्याबाबत गाफील राहू नका. हितशत्रूवर विजय मिळवाल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
कर्क : कला आणि साहित्य क्षेत्रातील लोकांना संधी मिळतील. संततीकडून आनंदाची बातमी समजेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. दिवस उत्साही राहील.
सिंह : मालमत्तेशी संबंधित रखडलेले व्यवहार आज मार्गी लागतील. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी काही सकारात्मक बदल घडतील.
कन्या : तुमच्या पराक्रमात आणि आत्मविश्वासात वाढ होईल. लहान भावा-बहिणींचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग असून नवीन लोकांशी संपर्क वाढेल.
तूळ : आर्थिक गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे. गोड बोलण्याने तुमची कठीण कामेही सोपी होतील. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील.
वृश्चिक : आज चंद्र तुमच्याच राशीत असल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.
धनू : पैशांचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. खर्च वाढू शकतात. आध्यात्मिक कामांकडे कल वाढेल. ध्यान आणि योगासने केल्याने आराम मिळेल.
मकर : आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या अत्यंत लाभदायी ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल.
कुंभ : नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.
मीन : नशिबाची साथ लाभल्यामुळे नियोजित कामे यशस्वी होतील. धार्मिक स्थळाला भेट देण्याचे योग आहेत. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल.