

मेष ः पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. चांगल्या मित्रांना बोलवा. कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल.
वृषभ ः कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे.
मिथुन ः पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. शेजार्याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल.
कर्क ः तुम्ही एकटे असाल; परंतु शांत नाही. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो.
सिंह ः कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल.
कन्या ः मतभिन्नता आणि दडपण यामुळे बैचेन व्हाल. तुम्ही जीवनात पैशाची किंमत मानत नाही; परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते .
तूळ ः ध्येयं, उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस. ती साध्य करण्यासाठी न थांबता सातत्याने प्रयत्न करण्यासाठी तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण करा.
वृश्चिक ः तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. आज स्वयंसेवी कामाचा उपयोग स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल.
धनु ः आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या यशाचा अभिमान वाटेल. तुमच्या प्रेमाच्या द़ृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे.
मकर ः अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा.
कुंभ ः दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र-मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे.
मीन ः आपल्या गरजेच्या कामाला पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी वेळ नक्कीच काढाल. कामाच्या ठिकाणी आज तुमची एका छान व्यक्तीशी ओळख होईल.