

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल; परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते.
वृषभ : द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बानवा, आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
मिथुन : प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल.
कर्क : ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता; परंतु त्या कामांना पूर्ण करण्यात समर्थ होऊ शकत नव्हता, ती कामे होतील.
सिंह : प्रवास-करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. आजचा दिवस अनुकूल आहे.
कन्या : कलात्मक लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल.
तूळ : आयुष्याकडे दुखी गंभीर चेहन्याने पाहू नका. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा.
वृश्चिक : खूप काळापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने समाधान लाभेल. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत.
धनु : आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. सहकाऱ्यांची मदत मिळेल. वरिष्ठ कौतुक करतील. दिवस चांगला जाईल.
मकर : आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल.
कुंभ : आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या.
मीन : अडचणीत चपळाईने कामाची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. कामाच्या ठिकाणी अनुकूल असे वातावरण असेल.