

मेष : संध्याकाळ उजाडताच प्रियाराधन करण्याकडे तुमचा कल वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात होणारी जुन्या मित्राची भेट उल्हसित करेल.
वृषभ : स्वतःला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय घातक ठरू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन : आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल.
कर्क : कुणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. आपल्या प्रियजनांना न आवडणारे कपडे वापरू नका.
सिंह : अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्ट आहे ती वापरा. आपल्या जुन्या मित्राच्या भेटीमुळे आजची सायंकाळ बहरून जाईल.
कन्या : घरगुती कामाचा पसारा कमी करण्यासाठी पत्नीला मदत करा. त्यामुळे सुख तर वाढेलच; पण सहजीवनाची अनुभूतीदेखील जाणवेल.
तूळ : तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव्र दुःख देईल.
वृश्चिक : आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे धाडसी निर्णय घ्या.
धनु : भूतकाळातील चुकीच्या निर्णयांमुळे आज मानसिक गोंधळ उडेल. पुढे काय करायचे हे ठरविणे अवघड होऊन बसेल. इतरांची मदत घ्या.
मकर : आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट आणि चोख असू द्या. उत्तम मानवी मूल्ये जोपासा.
कुंभ : प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आपणास आनंदी ठेवण्यासाठी पालक आणि मित्र त्यांच्यापरीने प्रयत्न करतील.
मीन : चिंता करणे व विसरून जाणे हे पहिले पाऊल असेल. आयुष्यातील महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा.