

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामात नवीन संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ : जुन्या कामांना गती मिळेल. मित्रांकडून चांगली मदत मिळेल. प्रवासाची शक्यता दिसते. मन शांत ठेवणे फायदेशीर ठरेल.
मिथुन : नवीन ओळखी उपयोगी पडतील. व्यवसायात लाभाचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांना यश मिळेल. अति विचार टाळा.
कर्क : घरातील वातावरण उत्साही राहील. नोकरीत कौतुक मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराची साथ लाभेल.
सिंह : आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्या. प्रलंबित काम पूर्ण होईल. आरोग्य चांगले राहील.
कन्या: कामाचा ताण कमी होईल. आर्थिक लाभ संभवतो. नातेवाईकांशी संवाद वाढेल. प्रवासात काळजी घ्या.
तूळ : भागीदारीत फायदा मिळेल. मनातील योजना पूर्ण होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. धैर्यान परिस्थिती हाताळा.
वृश्चिक : नवीन काम ॐ सुरू करण्यास दिवस चांगला. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. आरामासाठी वेळ काढा.
धनु : अचानक लाभाची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल. मित्रांसोबत आनंदात वेळ जाईल. रागावर नियंत्रण ठेवा.
मकर : महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होईल. कौटुंबिक प्रश्न सुटतील. व्यवसायात सावधगिरी आवश्यक. आरोग्य सुधारेल.
कुंभ : नवीन कल्पनांना यश मिळेल. कामात प्रगती दिसेल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. आर्थिक नियोजन करा.
मीन : मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळा.