

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाचे कौतुक होईल. जोडीदाराचे संबंध मधुर राहतील.
वृषभ : आर्थिक दृष्टीने आजचा दिवस फायदेशीर ठरू शकतो. रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या, खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा.
मिथुन : आज तुम्हाला नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ काढा.
कर्क : आजचा दिवस धावपळीचा असू शकतो. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे; पण संयम राखल्यास यश नक्की मिळेल.
सिंह : तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे.
कन्या : नोकरी शोधणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. घरी पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे वातावरण राहील.
तूळ : आज तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. जोडीदाराच्या मदतीने एखादे मोठे काम पूर्ण होईल. प्रवासाचे योग आहेत.
वृश्चिक : आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. हितशत्रूपासून सावध राहा. आध्यात्मिक कामात रुची वाढेल.
धनु : विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात.
मकर : प्रॉपर्टीशी संबंधित कामात यश मिळेल. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ : तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.
मीन : आज दिवसभर प्रसन्न वाटेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा बेत आखू शकता.