

मेष : तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. तणावमुक्तीसाठी कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल.
वृषभ : कामावर लक्ष केंद्रित करा. कारण आज चमकणार आहात. काहींना विदेशी जाण्याच्या संधी मिळण्याची शक्यता.
मिथुन : प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात कमालीचा आनंद मिळविण्यात व्यस्त व्हाल. त्यामुळे आज कामाकडे लक्ष लागणार नाही.
कर्क : नैराश्याचा त्रास आला असेल तर योग्य पावले उचलली आणि विचारांना प्राधान्य दिले तर समाधान आणि आराम लाभेल.
सिंह : आज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे आणि मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाल, अस्वस्थ व्हाल.
कन्या : एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही आनंदाचा स्रोत असेल. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल.
तूळ : तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे.
वृश्चिक : प्रचंड चिंता आणि तणावामुळे तुमची प्रकृती बिघडेल. गोंधळ व नैराश्य टाळा आणि मानसिक स्पष्टता ठेवा.
धन : मित्र-मैत्रिणींसोबत काहीतरी मस्तीखोर करण्यासाठी एकदम योग्य दिवस. प्रेमाचा प्रवास मधूर पण क्षणकाल टिकणारा असेल.
मकर : प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तीव्र दुःख देईल. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल.
कुंभ : आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे.
मीन : कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल.