

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : वैयक्तिक मार्गदर्शन नातेसंबंध सुधारतील. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल.
वृषभ : अनेक तणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे; पण भविष्य चांगले असेल. घरच्यांची साथ लाभेल. ज्येष्ठांचे मत विचारात घ्या.
मिथुन : ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. धन लाभ होण्याची शक्यता.
कर्क : अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळतील; पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल. आर्थिक कमाई होईल.
सिंह : अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. मुलांबाबत सहनशीलता बाळगा. नव्या गाठीभेटी आणि नवीन मित्र होतील.
कन्या : एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमचा जोडीदाराशी वाद होईल. तुमच्या केलेल्या कामाबद्दल वरिष्ठ आज तुमचे कौतुक करतील.
तूळ : खर्चात वाढ झाल्याने बचत दुरापास्त ठरेल. आज सहभागी झालेल्या सामाजिक कार्यक्रमात तुम्ही आकर्षणबिंदू ठराल.
वृश्चिक : पराभव, अपयशातून काही धडे घ्या; अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावर उलटतील. स्वतःला समजून घेण्याची आवश्यकता आहे.
धनु : प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. एक चांगला जोडीदार मिळेल. दिवस चांगला जाईल.
मकर : समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल.
कुंभ : अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल.
मीन : आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराबरोबर ताळमेळ साधल्यास सुख-समृद्धी व शांतता नांदेल.