

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नवीन कल्पनेला दिशा मिळेल. कामातील अडथळा दूर होईल. जवळच्या व्यक्तीची मदत मिळेल. घाईचे निर्णय टाळा.
वृषभ : पैशांबाबत चांगली बातमी मिळेल. जुने काम पुन्हा मार्गी लागेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन : संवादातून महत्त्वाचे काम साध्य होईल. नवी ओळख उपयोगी ठरेल. प्रवासाची शक्यता आहे. मनातील संभ्रम कमी होईल.
कर्क : आज भावना अधिक प्रभावी राहतील. घरातील प्रश्न शांततेने सोडवा. कामात कौतुक मिळण्याची शक्यता. खर्चावर नियंत्रण ठेवा.
सिंह : आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा दिवस. अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. नवीन संधी समोर येईल. अहंकार टाळल्यास फायदा होईल.
कन्या : अर्धवट कामे पूर्ण करण्याची संधी. कागदोपत्री कामात यश मिळेल. जवळच्या व्यक्तीकडून सल्ला मिळेल.
तूळ : नात्यांमध्ये गोडवा वाढेल. महत्त्वाचा निर्णय घेता येईल. कामाचा ताण थोडा कमी होईल. अनपेक्षित लाभ मिळू शकतो.
वृश्चिक : आज संयम तुमची ताकद ठरेल. गुप्त योजना यशस्वी होऊ शकते. आर्थिक व्यवहार जपून करा. जुन्या मित्राची भेट होईल.
धनू : नव्या दिशेने पाऊल पडेल. कामानिमित्त प्रवास संभवतो. आत्मविश्वास वाढेल. उतावळेपणा मात्र टाळा.
मकर : जबाबदारी वाढली तरी यश मिळेल. वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे राहील. आर्थिक नियोजनाला गती द्या. कुटुंबासाठी वेळ काढा.
कुंभ : वेगळी कल्पना चर्चेत येईल. नवीन संधीचे संकेत मिळतील. मित्रांकडून चांगली बातमी येईल. झोप आणि विश्रांतीकडे लक्ष द्या.
मीन : मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता. कामात सकारात्मक बदल घडेल. जवळची व्यक्ती आनंद देईल. आज स्वतःवर विश्वास ठेवा.