

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : स्वतःबद्दल छान वाटावे, अशा गोष्टी घडण्याचा दिवस. धनलाभहोण्याची पूर्ण शक्यता; परंतु यात तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे.
वृषभ : कुटुंबीयांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्या आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता, हे त्यांना कळू शकेल.
मिथुन : तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. काही नवे मित्र जोडाल. कुटुंबाला महत्त्व द्या.
कर्क : इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आयुष्य बहरून जाईल. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
सिंह : तुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर, उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल.
कन्या : घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल; परंतु जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो.
तूळ : प्रेमी युगुलांनी कुटुंबांच्या भावनाचा विचार केला पाहिजे. धंद्यामध्ये नव्या संकल्पनांना सकारात्मक प्रतिसाद हिताचा ठरेल.
वृश्चिक : कोणा तिसऱ्याने कान फुंकल्यामुळे जोडीदार तुमच्याशी भांडण करेल; पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल.
धनु : तुमच्याकडे कमी सहनशीलता असेल. कठोर बोलण्यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. दक्ष राहा.
मकर : गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे संपर्क वापरा. आज अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खूश करण्याची अनेक कारणे आहेत.
कुंभ : व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे नमावे लागेल. मुलांच्या कामामुळे आनंदी राहाल.
मीन : आज घरी बसून आराम करण्याची गरज आहे. आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल, अशा गोष्टी करा. प्रलंबित कामे पूर्ण कराल.