

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : रखडलेली कामे मार्गी लागतील. पण घरातील मोठ्यांशी संवाद साधताना संयम : आजचा दिवस उत्साहाचा राहील. ठेवा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ : कौटुंबिक सुखाचा लाभ मिळेल. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा.
मिथुन : मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. व्यवसायात नवे बदल फायदेशीर ठरतील. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होऊन नात्यात गोडवा येईल.
कर्क : आज कामाचा ताण अधिक जाणवेल. पण मेहनतीचे फळ निश्चित मिळेल. प्रवासाचे योग असून नवीन संधी चालून येतील. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
सिंह : आत्मविश्वास वाढेल आणि सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळण्याचे संकेत आहेत.
कन्या : घरातील कामात व्यस्त राहाल. नवीन वस्तू खरेदीचा योग आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. पण कोणाशीही वाद घालणे टाळा.
तूळ : सर्जनशील कामात रस वाढेल. भावंडांकडून मदत मिळेल. रखडलेली आर्थिक कामे पूर्ण होतील. दिवस आनंदी आणि सकारात्मक राहील.
वृश्चिक : वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. व्यवसायात घाईने निर्णय घेऊ नका. पाहुण्यांच्या आगमनाने घरातील वातावरण प्रसन्न होईल.
धनु : आरोग्य उत्तम राहील आणि जुन्या व्याधींपासून आराम मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा बेत आखू शकता.
मकर : खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा आर्थिक चणचण भासेल. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. ध्यानधारणा केल्याने मानसिक शांती लाभेल.
कुंभ : उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. रखडलेले महत्त्वाचे प्रकल्प पुन्हा सुरू होतील. प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील.
मीन : कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत बढतीचे योग आहेत. कुटुंबात शुभ कार्य ठरण्याची शक्यता असून दिवस समाधानाचा जाईल.