

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : रखडलेली गोष्ट मार्गी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयाला महत्त्व मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता. प्रवासाचा योग.
वृषभ : कौटुंबिक चर्चेत तुमचे मत निर्णायक ठरेल. गैरसमज दूर होऊन नाते दृढ होईल. अपेक्षित रक्कम हातात पडू शकते. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मिथुन : नवीन ओळख फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. रखडलेले काम पूर्ण होईल. आनंदाची बातमी मिळेल.
कर्क : नोकरी किंवा व्यवसायात नवी जबाबदारी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. घरात शुभकार्याची चर्चा सुरू होईल.
सिंहः धाडसी निर्णयाचा फायदा होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. मित्रांच्या मदतीने महत्त्वाचे काम पूर्ण होईल. लाभदायक संधी मिळेल.
कन्या : नवीन कामाची सुरुवात यशस्वी ठरेल. करिअरमध्ये अपेक्षित बदलाची चाहूल लागेल. समाधान मिळेल. चिंता दूर होईल.
तूळ : व्यवसायात नवीन करार होतील. जोडीदाराची साथ मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल.
वृश्चिक : महत्त्वाचा निर्णय तुमच्या बाजूने लागणार आहे. आर्थिक लाभहोईल. शुभवार्ता मिळेल. उत्साहवर्धक घडामोडींचा दिवस.
धनू : नोकरीत प्रगतीचे संकेत. परदेशाशी संबंधित कामाला गती येईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मकर : रखडलेले सरकारी काम पूर्ण होईल. व्यवसायातील अडथळे दूर होऊन उत्पन्न वाढेल. मुलांबद्दल अभिमान वाटेल.
कुंभ : मोठी संधी दारात येईल. महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील.
मीन : मोठी चिंता संपणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. नवीन उत्पन्नाचा मार्ग खुला होईल.