

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आज तुमचे पैसे व्यर्थ खर्च होऊ शकतात. जर बचत करायची आहे, तर तुम्ही आपल्या माता-पित्यासोबत या बाबतीत बोलू शकता.
वृषभ : कुणाला तरी भेटण्याची योजना जोडीदाराच्या अस्वास्थ्यामुळे बारगळली, तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल.
मिथुन : आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता, अशा लोकांशी संवाद साधा.
कर्क : पूर्वीच्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रेमाने भरलेले वातावरण राहील.
सिंह : तुम्ही विद्यार्थी असाल आणि परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे, तर घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असेल.
कन्या : तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साहामुळे तुम्हाला सुयोग्य ठरतील, असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील.
तूळ : बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल.
वृश्चिक : भागीदारीतील प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा काही प्रश्न निर्माण होतील.
धनु : तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या त-हेने मांडल्या आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत, तर तुम्ही फायद्यात राहाल.
मकर : ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही.
कुंभ : तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे.
मीन : मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. तुम्हाला आनंद देतील, अशा गोष्टी करा.