

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामपणा वाटेल. आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही.
वृषभ : प्रलंबित असणाऱ्या निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवे संयुक्तिक प्रकल्प मार्गी लागतील. कार्यात पत्नीची साथ मिळेल.
मिथुन : कार्यालयीन काम फत्ते होईल. कारण, सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल. पदोन्नतीची शक्यता.
कर्क : घरात काही घडल्याने तुम्ही भावनिक व्हाल. तुमच्या भावना संबंधितांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचविण्यात यशस्वी व्हाल.
सिंह : दिवस उत्तम आहे. स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. मित्रांसह बाहेर फिरायला जाल.
कन्या: प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही थकून जाल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. नातेवाईकांसह बाहेर जेवायला जाल.
तूळ सुधारेल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. दिवस आनंदात जाईल. आर्थिक लाभाची शक्यता. : सांपत्तिक स्थिती
वृश्चिक : गुप्त माहिती तुम्ही उघड करू नका. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल, तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल.
धनु : कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळेल.
मकर : आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते भविष्याची दिशा दाखवतील.
कुंभ : कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तणाव वाढवतील. कामावरील लक्ष विचलित होईल.
मीन : तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे.