

मेष : तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करा. कामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल.
वृषभ : आकर्षक, मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभहोण्याची पूर्ण शक्यता.
मिथुन : गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा योग्य कामासाठी तिचा वापर करा.
कर्क : आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील.
सिंह : तुम्ही चिंतित व्हाल. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे. मनावर ताबा ठेवावा लागेल.
कन्या : थोर व्यक्तीचे शुभाशीर्वाद मनःशांती मिळवून देतील. आई - वडिलांच्या आरोग्यावर अधिक धन खर्च करावे लागू शकते.
तूळ : तुमच्या दयाळू स्वभावामुळे अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली, तर खूप फायदेशीर ठरेल.
वृश्चिक : मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो.
धनु : कुणाच्याही मदतीविना धन कमावण्यात सक्षम राहू शकता. केवळ तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज.
मकर : आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे आत्मविश्वास आणि लवचिकता वाढेल.
कुंभ : मानसिक, शारीरिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तणाव कमी करण्यासाठी संपूर्ण विश्रांतीची गरज. आर्थिक आवक झाल्याने प्रलंबित देणी भागवाल.
मीन : कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पूर्ण करण्याची काळजी घेईल. अधिकचा पैसा स्थावर-जंगम मालमत्तेत गुंतवा.