

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामात उत्साह आणि नवी ऊर्जा राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
वृषभ : कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. जुन्या मित्रांची भेट आनंद देईल.
मिथुन : नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. संवादातून महत्त्वाची कामे होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
कर्क : चिंता कमी होईल. कामात संयमाने निर्णय घ्या. आर्थिक नियोजनाला प्राधान्य द्या. जवळच्या व्यक्तींची साथ मिळेल.
सिंह : आत्मविश्वासामुळे कामात यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरेल.
कन्या : नियोजनबद्ध कामामुळे प्रगती होईल. आर्थिक बाबतीत समाधान मिळेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
तूळ : ओळखीतून लाभ होईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. खर्च वाढेल. जोडीदारासोबत आनंदी क्षण मिळतील.
वृश्चिक : मेहनतीचे फळ मिळेल. कामातील अडथळे दूर होतील. आर्थिक व्यवहारात दक्षता ठेवा. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
धनू : नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. प्रवासाचे योग संभवतात.
मकर : कामात जबाबदाऱ्या वाढू शकतात. प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. पैशांच्या व्यवहारात घाई टाळा.
कुंभ : सर्जनशील विचारांना चालना मिळेल. मित्रांकडून मदत मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
मीन : दिवस उत्साहवर्धक आणि सकारात्मक राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. गुंतवणुकीपूर्वी योग्य विचार करा.