

मेष : जितके शक्य असेल याची काळजी घ्या. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल.
वृषभ : चपळ कृतीमुळे उत्तेजन मिळेल, यश मिळविण्यासाठी वेळकाळ पाहन संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे दृष्टिकोन विस्तारेल.
मिथुन : मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील; पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घ्या.
कर्क : आपण ज्याची काळजी करतो, अशा व्यक्तीशी संवाद न झाल्यामुळे उदास व्हाल. प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खाईल.
सिंह : धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशीर्वाद मनःशांती मिळवून देतील. व्यर्थ खर्च करण्यापासून थांबवले पाहिजे अथवा गरजेच्या वेळी पैशाची कमतरता होऊ शकते.
कन्या : जुन्या मित्रांवरोवरील भेटीगाठी उत्साह द्विगुणित करतील. नातेवाईकाकडे जाणे आज आर्थिक स्थितीला बिघडवू शकते.
तूळ : गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे घातक सिद्ध होऊ शकते. जोडीदाराशी दिवसभरात भांडण होईल.
वृश्चिक : आज तुम्ही सहजपणे समस्यांवर मात कराल आणि विजेते ठराल. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल.
धनु : प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे मूड खराब करू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल.
मकर : महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहारासाठी अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती उत्तम. मनोबल उंचावेल.
कुंभ : अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा, अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल. काळजी घ्यावी लागेल.
मीन : आज एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा मूड बनेल. प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल.