

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : दंतदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या निर्माण होईल. ताबडतोब आराम पडावा, यासाठी वैद्यकीय सल्ला घ्या.
वृषभ : आजच्या दिवशी धनलाभ होण्याची शक्यता आहे; परंतु तुम्ही दान-पुण्यही केले पाहिजे. कारण, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
मिथुन : महत्त्वाकांक्षांना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे.
कर्क : आज तुम्ही ऑफिसच्या कामांना इतके लवकर पूर्ण कराल की, तुमचे सहकारी पाहत राहतील. आर्थिक लाभ होईल. आरोग्य जपा.
सिंह : सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे.
कन्या : तिहाईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल; पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल.
तूळ : भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल तर दुखावले जाल, अशा परिस्थिती-प्रसंगांपासून दूर राहा, सावध राहा.
वृश्चिक : तुमचा जोडीदार आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा जास्त आपल्या गोष्टी सांगणे पसंत करेल. ज्यामुळे तुम्ही थोडे खिन्न होऊ शकता.
धनु : हळूहळू परंतु, आयुष्य सुरळीत होत आहे, या गोष्टीचा तुम्हाला अनुभव होईल. उत्साह सळसळता राहील. दिवस चांगला जाईल.
मकर : बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल. तब्येतीची काळजी घ्या.
कुंभ: आज प्रवासाचा लाभ भविष्यात मिळेल. मेहनतीला यश येईल. सकारात्मक विचारांच्या सहवासात राहा. मुलांचा अभिमान वाटेल.
मीन : संध्याकाळ मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते; परंतु चिंता करण्याचे कारण नाही. निराशेपेक्षा आनंदामुळे खुशीत राहाल.