

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नवा विचार मनात येईल. कामात वेग वाढेल. अनपेक्षित संधी मिळेल. जवळच्या व्यक्तीची मदत होईल. धाडसी निर्णय फायदेशीर ठरेल.
वृषभ : पैशांबाबत चांगली बातमी मिळू शकते. जुने रखडलेले काम पूर्ण होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जुनी चिंता कमी होईल.
मिथुन : नवी ओळख महत्त्वाची ठरेल. एखादे काम बोलण्यातून सहज साधेल. चांगली बातमी मिळू शकते. कामात उत्साह वाढेल.
कर्क : संभ्रम कमी होईल. कुटुंबाची साथ मिळेल. थांबलेले काम पुन्हा मार्गी लागेल. जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सिंह : तुमचा प्रभाव अधिक जाणवेल. नवे आव्हान स्वीकारण्याची संधी मिळेल. कामात कौतुक होण्याची शक्यता. महत्त्वाची व्यक्ती भेटेल.
कन्या : लहानसा निर्णय मोठा बदल घडवू शकतो. कामात अचूकता दिसून येईल. अनपेक्षित ठिकाणाहून मदत मिळेल. जुना प्रश्न सुटेल.
तूळ : नात्यातील गैरसमज दूर होईल. नवा संवाद मन हलके करेल. चांगली बातमी मिळू शकते. मित्राची मदत उपयोगी ठरेल.
वृश्चिक : लपलेली संधी समोर येऊ शकते. जुन्या अनुभवाचा फायदा होईल. दिवस तुमच्या बाजूने वळू शकतो. अनावश्यक धोका टाळाल.
धनू : नवा मार्ग, कल्पना सुचेल. प्रवासाचा योग संभवतो. मित्राकडून अनपेक्षित मदत मिळेल. कामात नवीन जबाबदारी येऊ शकते.
मकर : मेहनतीचे अपेक्षित फळ मिळू शकते. ज्याची वाट पाहत होतात ते काम पुढे सरकेल. मोठा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते.
कुंभ : अनपेक्षित घडू शकते. एखादी व्यक्ती नवी दिशा दाखवेल. जुनी चौकट सोडण्याची वेळ येईल. समाधान देणारी बातमी मिळेल.
मीन : अंतर्मनाचा आवाज महत्त्वाचा ठरेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. जवळच्या व्यक्तीची साथ मिळेल. चिंता दूर होतील.