Horoscope 17 February 2026: 'या' राशींचा धाडसी निर्णय आज फायदेशीर ठरेल; जाणून घ्या आजचे राशिभविष्य
Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष
मेष : कामाच्या ठिकाणी नवे दायित्व मिळू शकते. आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील.
वृषभ
वृषभ : नवीन योजना सुरू करण्यास दिवस अनुकूल. व्यावसायिकांना लाभाची शक्यता. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळा.
मिथुन
मिथुन : संवाद कौशल्यामुळे कामे सुरळीत होतील. विद्यार्थ्यांसाठी प्रगतिकारक दिवस. प्रवासाचे योग संभवतात. मानसिक शांतता राखा.
कर्क
कर्कः घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. भावनिक निर्णय टाळावेत.
सिंह
सिंह : धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आरोग्य उत्तम राहील. जोडीदाराशी संवाद साधा.
कन्या
कन्या : कामाचा ताण जाणवू शकतो, वेळेचे नियोजन महत्त्वाचे. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
तूळ
तूळ : भागीदारीत लाभमिळू शकतो. कला व सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना संधी मिळेल. आरोग्य सुधारेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक
वृश्चिक : अडकलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. नातेसंबंधात पारदर्शकता ठेवा. प्रवास टाळणे हिताचे.
धनु
धनु : नवीन संपर्क उपयोगी ठरतील. व्यवसायात विस्ताराचे संकेत. विद्यार्थ्यांना यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
मकर
मकर : शांतपणे काम केल्यास यश निश्चित. ज्येष्ठांचा सल्ला लाभदायक. आर्थिक नियोजन आवश्यक. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ
कुंभ : नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी. सामाजिक कामात सहभाग वाढेल. मित्रांकडून आनंदवार्ता मिळेल.
मीन
मीन : आध्यात्मिक कल वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत. कुटुंबासोबत वेळ घालवा. भावनिक संतुलन आवश्यक.

