

मेष : आज आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील.
वृषभ : नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता पत्रिकेत दिसून येते.
मिथुन : मनस्थिती स्थिर राहू शकते. आज जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.
कर्क : विचारांनीच मनुष्याचे जीवन बनते-तुम्ही एक उत्तम पुस्तक वाचून आपल्या विचारधारेला अधिक सशक्त करा.
सिंह : कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, हे लक्षात ठेऊन आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. मनावर ताबा ठेवा.
कन्या : आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल.
तूळ : आज काही चिंता तुम्हाला दिवसभर त्रास देऊ शकते. त्या चिंतेला दूर करण्यासाठी घरच्यांसोबत बोलले पाहिजे.
वृश्चिक : अनेक माध्यमातून आर्थिक लाभहोतील. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका, सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा.
धनु : दिवसाच्या उर्वरित काळात पैशाची स्थिती सुधारेल. आजच्या दिवशी मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करा.
मकर : पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. म्हणून अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही.
कुंभ : जेव्हा तुमच्या जवळ जास्त रिकामा वेळ असेल, तर नकारात्मक विचार तुम्हाला जास्त चिंतीत करू शकतात. त्यामुळे कोणतीही कृती करताना काळजी घ्या.
मीन : ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. मनोबल उंचावेल.