

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. आर्थिक व्यवहारात घाईघाईने निर्णय घेऊ नका.
वृषभ : कामातील सातत्यामुळे चांगले परिणाम मिळतील. आर्थिक नियोजनासाठी दिवस अनुकूल. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढेल.
मिथुनः कल्पनांना प्रतिसाद मिळेल. महत्त्वाच्या चर्चामधून मार्ग निघेल. गैरसमज टाळण्यासाठी बोलताना स्पष्टता ठेवा.
कर्क : कामात संयम ठेवल्यास अडचणींवर मात करता येईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. भावनिक आधार मिळेल.
सिंह : नेतृत्वगुणांमुळे दखल घेतली जाईल. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते. नात्यांत अहंकार बाजूला ठेवा.
कन्या : प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचला. सहकाऱ्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करा. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
तूळ : भागीदारीत समन्वय साधता येईल. उत्पन्न-खर्चाचा ताळेबंद तपासून पाहा. वैयक्तिक नात्यांत आनंददायी क्षण अनुभवता येतील.
वृश्चिक : चिकाटी ठेवल्यास प्रगती होईल. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजू तपासा. मतभेदांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
धनू : नवीन गोष्टी शिकण्यासाठी दिवस उत्साहवर्धक. कामानिमित्त प्रवास होईल. मित्रांच्या सल्ल्याच उपयोग होऊ शकतो.
मकर : मेहनतीचे परिणाम दिसतील. आर्थिक उद्दिष्टांसाठी ठोर नियोजन करा. वरिष्ठांशी बोलतान मुद्देसूद भूमिका मांडा.
कुंभ : वेगळ्या विचारांमुळे नवीन संध निर्माण होतील. आर्थिक निर्णय घेताना व्यवहार्य दृष्टिको ठेवा. संपर्कातून उपयुक्त माहित मिळेल.
मीन : सर्जनशील काम समाधान मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात कागदपत्रे तपासा. प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवता येईल.