Horoscope 15 February 2026: महाशिवरात्रीचा दिवस तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडवणार? पहा आजचे राशिभविष्य!

Mahashivratri 2026 Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष ः आज कामाच्या ठिकाणी जबाबदार्‍या वाढू शकतात; पण तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास तुम्हाला यश देईल. आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका.

वृषभ ः आर्थिक नियोजनासाठी चांगला दिवस. गुंतवणुकीसंबंधी विचारपूर्वक निर्णय घ्या. नातेसंबंधात गोडवा वाढेल. जुने वाद मिटवण्याची संधी मिळू शकते.

मिथुन ः नवीन ओळखी आणि संपर्क भविष्यासाठी लाभदायक ठरतील. कामात सर्जनशीलता दाखवण्याची संधी मिळेल. प्रवासाचा योग संभवतो.

कर्क ः भावनिक स्थैर्य महत्त्वाचे ठरेल. कुटुंबीयांच्या गरजांकडे लक्ष द्या. आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा, विशेषतः पचनसंस्थेची काळजी घ्या.

सिंह ः नेतृत्वगुणांमुळे कार्यक्षेत्रात कौतुक होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी संभवतात. आत्मविश्वास टिकवा; पण अहंकार टाळा.

कन्या ः कामात बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. कागदपत्रे आणि करार तपासूनच पुढे जा. आरोग्य सुधारण्यासाठी दिनचर्येत बदल करा.

तूळ ः भागीदारीत यश मिळण्याची शक्यता. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. मन:शांतीसाठी स्वतःसाठी वेळ काढा.

वृश्चिक ः गुप्त योजना किंवा दीर्घकालीन नियोजनाला चालना मिळेल. वैवाहिक जीवनात संवाद महत्त्वाचा ठरेल. संयम राखल्यास दिवस फलदायी ठरेल.

धनु ः शिक्षण, परदेश संपर्क किंवा प्रवास याबाबत चांगली बातमी मिळू शकते. नवीन संधी स्वीकारण्यास घाबरू नका. आरोग्य चांगले राहील.

मकर ः करिअरमध्ये प्रगतीचे संकेत. वरिष्ठांशी मतभेद टाळा. कुटुंबातील जबाबदार्‍या वाढतील. आर्थिक बाबतीत स्थिरता राखण्यासाठी शिस्त पाळा.

कुंभ ः नवीन कल्पनांना वाव मिळेल. सहकार्‍यांसोबत टीमवर्क फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंधात स्पष्टता आवश्यक. मानसिक शांततेसाठी ध्यानाचा उपयोग होईल.

मीन ः सर्जनशील कार्यात यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण अनुभवता येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news