

मेष : फायद्यात राहाल. तुमचे चुंबकीयसदृश आत्मविश्वासी आनंदी व्यक्तिमत्त्व तुम्हाला प्रकाशझोतात आणेल.
वृषभ : तुमच्या मनातील समस्या बाजूला सारा आणि घर तसेच मित्रमंडळींमध्ये तुमची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.
मिथुन : नोकरी पेशातील लोकांना आज कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुमच्याकडून नकळत चूक होऊ शकते.
कर्क : तुम्हाला तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल.
सिंह : थोड्या-फार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेमजीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खूश ठेवण्यात यशस्वी व्हाल.
कन्या : नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. तुमच्या आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा.
तूळ : अवघडलेपण, असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात; पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील.
वृश्चिक : काही समस्या उद्भवतील; पण वास्तववादी राहा आणि मदत करणाऱ्या लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका.
धनु : नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे; परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल.
मकर : प्रेमजीवनात आनंद आणाल. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे.
कुंभ : कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये, शांतता राहावी आणि यासाठी तुम्ही रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे.
मीन : आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी मागच्या दिवसांत तुम्ही जितकी धन गुंतवणूक केली होती, त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो.