

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामातील उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. बोलताना स्पष्टता ठेवा.
कर्क : मन प्रसन्न आणि उत्साही राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. घरातील शुभवार्ता आनंद देईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
सिंह : वरिष्ठांकडून कौतुक होईल. कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल. आर्थिक नियोजनासाठी दिवस अनुकूल. नात्यांत गोडवा ठेवा.
कन्या : नियोजनामुळे यश मिळेल. नवीन संधींचा लाभ घेता येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
तूळ : आर्थिक बाबतीत अनुकूल घडामोडी होतील. व्यवसायात नवीन संपर्क लाभदायक ठरतील. जोडीदाराशी संबंध मधुर राहतील.
वृश्चिक : कठीण कामे आत्मविश्वासामुळे पूर्ण होतील. नोकरीत जबाबदारी वाढण्याची शक्यता. आर्थिक व्यवहारात सावध राहा.
धनू : आज भाग्याची चांगली साथ मिळेल. प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.
मकर : कामातील अडथळे दूर होण्याची शक्यता. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. संयम ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल.
कुंभ : नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला. मित्रांकडून मदत मिळेल. उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होतील.
मीन : मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता. नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील.