

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील.
वृषभ : मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. धीर संयम ठेवल्यास दिवस चांगला जाईल.
मिथुन : नवीन आखण्यासाठी योग्य दिवस. कार्यक्षेत्रात कौतुक मिळू शकते. जवळच्या व्यक्तीसोबत संवाद वाढेल. प्रवासाचा योग.
कर्क : घरगुती वातावरण आनंदी राहील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याची काळजी घ्यावी.
सिंह : आत्मविश्वास वाढेल. कामात प्रगतीचे संकेत मिळतील. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. नवीन संधींचा योग्य फायदा घ्या.
कन्या : संयम राखणे महत्त्वाचे आहे. कार्यक्षेत्रात ताण जाणवू शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. लहान प्रवासाचा योग संभवतो.
तूळ : आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता. नवीन ओळखीमुळे वातावरण सुखद राहील.
वृश्चिक : कामात लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल. प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. मित्रांकडून मदत मिळेल. आरोग्याबाबत जागरूक राहा.
धनु : नवीन कल्पना सुचतील. प्रगती होईल. बदलाची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मकर : कामात चांगले परिणाम मिळतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक स्थिरता राहील. आरोग्य चांगले राहण्याची शक्यता.
कुंभ: सर्जनशील कामासाठी उत्तम दिवस. नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. कुटुंबात संवाद वाढेल. महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या.
मीन : भावनिक संतुलन ठेवणे आवश्यक. कार्यक्षेत्रात व्यस्तता वाढेल. आर्थिक लाभाची शक्यता. स्वतःवर विश्वास ठेवा.