

मेष : उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल चित्र मनात ठसवा. आई-वडिलांच्या आरोग्यावर अधिक धन खर्च करावे लागू शकते.
वृषभ : मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल, मनोबल उंचावेल.
मिथुन : वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या तणावात भर पडेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल.
कर्क : तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. भागीदारीतली व्यवसायाची संधी चांगली वाटेल; पण सर्व बाबींची स्पष्टता असणे गरजेचे.
सिंह : दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतः साठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. सकारात्मक मागनि विचार करावा लागेल.
कन्या : लोक सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल.
तूळ : मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका.
वृश्चिक : अनपेक्षित 3 प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. एखादा नातेवाईक सरप्राईज देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.
धनु : शेरेबाजीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल, भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडेल असे कृत्य करणे टाळा.
मकर : मित्रमैत्रिणीं सोबतची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनाही तयार कराल. मन आनंदी होईल.
कुंभ : तुमचा मानसिक तणाव वाढेल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. घरातील वयोवृद्धाची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. मनावर ताबा ठेवा.
मीन : प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. धाडसाने उचललेली पावले लाभदायक ठरतील.