

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा.
वृषभ : मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधानता बाळगा. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल.
मिथुन : स्वप्ने साकार होतील. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. जोडीदाराची साथ लाभेल.
कर्क : तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केलेत तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. लोक तुमचे अभिनंदन करतील.
सिंह : आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल.
कन्या : पालक कमालीचे उत्साही असतील. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरीत्या पूर्ण होईल.
तूळ : बराच काळ विचार करण्यात घालवाल. लहानशा बाबीवरून जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल.
वृश्चिक : संयम बाळगा. निरंतर प्रयत्नामुळे हमखास यशप्राप्ती होणार. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल.
धनु : अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे कुठलेही काम करू नका, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल.
मकर : प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. कामाच्या ठिकाणी इतरांचे नेतृत्व करा.
कुंभ : अत्यंत दक्ष राहावे लागेल. ताण तणाव आणि दडपणात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा.
मीन : मुलांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. सकारात्मक राहा.