

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. आज अनेक विषय, प्रश्न उद्भवतील.
वृषभ : अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य उंचावेल. जे लोक लघुउद्योग करतात, त्यांना जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो.
मिथुन : सकारात्मक दृष्टिकोन, विश्वास यामुळे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पडेल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे.
कर्क : तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. प्रलंबित घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस.
सिंह : मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. आज तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. देणी वसूल होतील.
कन्या: मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आर्थिक आघाडीवरील सुधारणा प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील.
तूळ : नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. स्पर्धेत यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : तुमच्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित लाभ मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या.
धनु : आशावादी राहा. उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आशा-आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस.
मकर : चैतन्याने सळसळता दिवस, अनपेक्षित लाभ होतील. जीवनसाथीच्या आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल.
कुंभ : जमीन व्यवहार करण्यासाठी स्थिती उत्तम आहे. दुसऱ्यांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभहोईल. लोक कौतुक करतील.
मीन : लोकांना चांगले काम करून दाखवा. तुम्ही किती सक्षम आहात, हेही दाखवून द्या. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस.