

मेष : दयाळू स्वभावामुळे आनंदाचे क्षण अनुभवाल. आर्थिकदृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. धनलाभही होऊ शकतो.
वृषभ : आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल.
मिथुन : खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल. मित्रांसोबत थट्टा करताना सीमा ओलांडू नका.
कर्क : पैशाची बचत करण्याचा विचार करा. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करील.
सिंह : आपल्या मनावर खूपच दडपण असेल, तर आपल्या नातेवाईकांशी अथवा जवळच्या मित्रांशी बोला. त्यामुळे आपल्यावरील ताण काहीसा हलका होईल.
कन्या : मानसिक स्पष्टता टिकविण्यासाठी संभ्रम आणि नैराश्यापासून दूर राहा. लोकांना नेमके काय हवेय, हे समजावून घ्या.
तूळ : अज्ञात व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता. ज्यामुळे मूड खराब होईल. जोडीदाराच्या वागणुकीचा नात्यांवर परिणाम होईल.
वृश्चिक : स्वप्नपूर्तीसाठी मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे. प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्याने घरात तणावाचे क्षण अनुभवाल.
धनु : अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल; पण नेमके कशाच्या मागे जावे, हे ठरविताना अडचणी येतील.
मकर : एकदा आयुष्यात प्रेम मिळाले की, मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल.
कुंभ : घरात कोणतेही बदल करायचे असतील, तर घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. अन्यथा, त्यांचा रोष ओढवून घ्याल आणि आनंद गमावून बसाल. मनावर ताबा ठेवा.
मीन : ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल; मात्र कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. मनोबल उंचावेल.