

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : दिवस संमिश्र फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी धावपळ होईल; पण मेहनतीचे योग्य फलित मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. रखडलेले जुने प्रकल्प मार्गी लागतील. प्रकृती जपा.
मिथुन : उद्योग, व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
कर्क : खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सावधगिरी बाळगा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे नोकरीत यश मिळेल. व्यवहार करताना दक्षता घ्या.
सिंह : आत्मविश्वासात वाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे. मित्रांची मदत लाभेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो.
तूळ : जोडीदाराची साथ लाभेल. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी मित्रांची मदत मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या.
वृश्चिक : गुप्त शत्रूपासून सावध राहा. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.c
धनू : धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. प्रवासाचे योग आहेत. संततीकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभही शक्य.
मकर : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये फायदा होऊ शकतो. कामाचा ताण जाणवेल.
कुंभ : बोलण्यावर संयम ठेवा. नवीन लोकांशी संपर्क होईल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.
मीन : मन प्रसन्न आणि उत्साही राहील. नोकरीत बढती किंवा मान-सन्मानाची शक्यता आहे. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल.