

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आज कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकते. कुटुंबीयांसोबत वेळ आनंदात जाईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
वृषभ : प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल. व्यवसायात लाभदायक निर्णय होऊ शकतात. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
मिथुन : नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. मनातील संभ्रम दूर होईल. प्रवासाचे योग संभवतात.
कर्क : कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढू शकतात. जुन्या मित्रांची भेट आनंद देईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. भावनिक निर्णय टाळावेत.
सिंह : आज आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठांचे कौतुक मिळेल. गुंतवणुकीतून लाभाची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील.
कन्या : महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तणाव वाढू शकतो.
तूळ : भागीदारीतील कामात फायदा होईल. नवीन योजना सुरू करण्यास दिवस चांगला आहे. जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळेल.
वृश्चिक : कामात मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक अडचणी कमी होतील. कौटुंबिक विषयांवर संयमी राहा. प्रवासात लाभाचे संकेत आहेत.
धनु : नवीन कामाची सुरुवात शुभ ठरेल. मित्रांसोबत आनंददायी वेळ जाईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल.
मकर : कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. जुने अडथळे दूर होतील. घरगुती खर्च वाढू शकतो. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
कुंभ: : व्यवसायात चांगला फायदा होईल. नवीन संपर्क उपयोगी ठरतील. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण मिळतील.
मीन : महत्त्वाच्या निर्णयात यश मिळेल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.