

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
मेष: श्रीगणेश सांगतात की, घरातील वडीलधाऱ्यांची काळजी घेणे आणि त्यांचा आदर केल्याने आपल्या भाग्यात वृद्धी होईल. राजकीय संपर्क आपल्यासाठी उत्तम संधी उपलब्ध करून देतील. महिलांसाठी आजचा दिवस विशेषतः शुभ आहे. त्यांची क्षमता आणि प्रतिभा त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यास मदत करेल. सावध राहा, भूतकाळातील नकारात्मक गोष्टी आपला वर्तमानकाळही बिघडवू शकतात, याची जाणीव ठेवा. पैशांच्या व्यवहारांशी संबंधित बाबींमध्ये काही वैयक्तिक संबंध बिघडू शकतात. व्यावसायिक क्षेत्रात कागदपत्रांशी संबंधित कामात पूर्ण पारदर्शकता ठेवा. पती-पत्नीमध्ये सहकार्याचे नाते राहील. पायांमध्ये वेदना आणि सूज येण्यासारख्या समस्या जाणवतील.
वृषभ: श्रीगणेश म्हणतात की, आज भावनेच्या आहारी न जाता व्यवहारी दृष्टीकोनातून काम करा. जवळच्या नातेवाईकांसोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. आपला राग आणि हस्तक्षेप कुटुंबातील सदस्यांसाठी त्रासाचे कारण ठरु शकतो. स्वभावात सकारात्मकता टिकवून ठेवा. तणावामुळे काही कामे अपूर्ण राहू शकतात. कार्यक्षेत्रात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन: श्रीगणेश सांगतात की, आपला वेळ धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात जाईल. आपण वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. कुटुंबातील प्रश्नांमध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. मुलांशी मित्राप्रमाणे वागा.जनसंपर्क अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा. पती-पत्नीच्या परस्पर सहकार्याने घरातील वातावरण चांगले राहील. रक्तदाबाची समस्या असणार्यांनी काळजी घ्यावी.
कर्क : श्रीगणेश म्हणतात की, आज राजकीय संबंध आपल्याला फायदा मिळवून देऊ शकतात. जनसंपर्काची व्याप्तीही वाढेल. समाजात आणि जवळच्या नातेवाईकांमध्ये आपले एक विशेष स्थान निर्माण होईल. आपल्या सेवाभावाने घरातील वडीलधारी मंडळी आनंदी राहतील; परंतु अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आळस टाळा. व्यावसायिक कामांमध्ये मंदगती राहील. घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सामंजस्य राखणे आवश्यक आहे. विचारांमधील नकारात्मकतेमुळे तणाव आणि नैराश्यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते.
सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज आपण आपला बहुतेक वेळ दैनंदिन कामकाजापासून दूर आपल्या वैयक्तिक आणि आवडीच्या कामांमध्ये घालवाल. सामाजिक कार्यातही आपल्याला रुची राहील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाशी संबंधित योग्य निकाल मिळाल्याने दिलासा मिळेल. कुटुंबातील सदस्याच्या वैवाहिक जीवनातील विभक्त होण्याच्या समस्येमुळे तणावाचे वातावरण राहील. आपली समज आणि सल्ला या समस्येवर तोडगा काढू शकतो. घरात शिस्तबद्ध वातावरण राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
कन्या: श्रीगणेश म्हणतात की, आपण आपल्या परिश्रमाने परिस्थिती स्वतःच्या अनुकूल करून घ्याल. विरोधक पराभूत होतील. न्यायालयीन खटल्याशी संबंधित सरकारी प्रकरणे सुरू असल्यास, त्यात सकारात्मक आशा दिसेल. मोठ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात अयोग्य काम करू नका, अन्यथा आपली बदनामी होऊ शकते. जवळच्या व्यक्तीशी संबंधित एखाद्या अप्रिय घटनेमुळे मन निराश होईल. सध्या व्यावसायिक कामांवर गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. पती-पत्नीच्या सहकार्याने घरातील वातावरण व्यवस्थित राहील. सौम्य प्रकारचे हंगामी आजार त्रासदायक ठरू शकतात.
तूळ : श्रीगणेश सांगतात की, आज इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम केल्याने अनेक समस्या सुटतील. नातेवाईकांशी संबंधित कोणताही वाद मिटेल आणि नात्यात पुन्हा गोडवा येईल. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा, कारण काही नुकसान होण्याची शक्यता आहे. विनाकारण कोणाशीही वाद होऊ शकतो. रागावर आणि संतापावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. वडिलोपार्जित व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये आज सकारात्मक परिणाम दिसून येतील. आपल्या कामाच्या ठिकाणचा ताण घरापर्यंत येऊ देऊ नका. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : श्रीगणेश म्हणतात की, आपले सकारात्मक विचार आपल्यासाठी नवीन यश निर्माण करत आहेत. काही विशेष लोकांच्या संपर्कात आल्याने आपल्या विचारशैलीत आश्चर्यकारक बदल घडवून आणेल. आपल्या जवळच्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने टीका केल्यास मन निराश होईल. सध्या आपल्या योजना मित्र आणि नातेवाईकांसमोर उघड करू नका. या काळात व्यवसायात कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील.
धनु: श्रीगणेश सांगतात की, आज घेतलेला एक सुज्ञ निर्णय आपली आर्थिक बाजू मजबूत करेल. जवळच्या नातेवाईकांशी भेट झाल्याने रोजच्या तणावातून मुक्तता मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चाही होईल. मनोरंजनासोबतच आपल्याला आपल्या वैयक्तिक कामांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. गरजू व्यक्तीला मदत करताना आपल्या बजेटची काळजी घ्या. व्यवसायाशी संबंधित कोणत्याही कामात अत्यंत महत्त्वाचा निर्णय स्वतः घ्या. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. रक्तदाब, मधुमेह असणार्यांनी स्वतःची काळजी घ्यावी.
मकर: श्रीगणेश सांगतात की, सर्व कामे व्यवस्थित आणि समन्वय साधून केल्यास आपल्याला आश्चर्यकारक यश मिळेल. आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित बाबींवर अधिक लक्ष केंद्रित करा. सध्याची परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल आहे. घरातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याबद्दल चिंता राहील. यामुळे काही महत्त्वाची कामे थांबू शकतात. अधिक शिस्त राखण्याची अपेक्षा करण्यापेक्षा आपल्या कार्यपद्धतीत लवचिकता आणणे उत्तम राहील. कार्यक्षेत्रात कोणताही व्यवहार करताना किंवा कोणाशीही बोलताना सावधगिरी बाळगा. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतील.
कुंभ: श्रीगणेश म्हणतात की, आज भाग्याच्या अपेक्षेपेक्षा कर्मावर विश्वास ठेवणे, आपल्यासाठी विशेषतः शुभदायक ठरेल. आपला वेळ राजकीय आणि सामाजिक कार्यातही जाईल. घरातील एक लहानसा मुद्दा मोठा वाद बनू शकतो, याची जाणीव ठेवा. कौटुंबिक प्रश्नात बाहेरी व्यक्तींना हस्तक्षेप करू देऊ नका. आपली अति शिस्तप्रिय वागणूक कुटुंबातील सदस्यांना त्रासदायक ठरू शकते. वाहन जपून चालवा.
मीन: श्रीगणेश सांगतात की, सध्या ग्रहस्थिती अनुकूल आहे. लाभाचे नवीन मार्ग सापडू शकतात. काही काळापासून सुरू असलेल्या समस्या योग्यप्रकारे सुटतील. एका प्रभावशाली व्यक्तीसोबतची भेट आपल्यासाठी महत्त्वाची ठरेल. अतिआत्मविश्वास आपल्यासाठी काही वेळा त्रासाचे ठरेल, याची जाणीव ठेवा. जवळच्या मित्र किंवा नातेवाईकासोबत मतभेद होऊ शकतात. या काळात आपल्या रागावर आणि भावनावेगावर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व कायम राहील. जोडीदाराचा विश्वास आणि पाठिंबा आपले मनोबल वाढवेल. चुकीच्या आहारामुळे पोट बिघडू शकते.