

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आज कामात अडथळे येऊ शकतात, पण संयम ठेवा. आर्थिक व्यवहार जपून करा. घरात शांतता राखणे गरजेचे. दिवस चांगला आहे.
वृषभ : व्यवसायात स्थिरता राहील. जुनी, रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. मन प्रसन्न राहील. हातात पैसे येतील.
मिथुन : नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कामात चुकांची शक्यता. मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. थकवा जाणवू शकतो.
कर्क : आज तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. घरगुती आनंद वाढेल. महत्त्वाचा निर्णय पुढे ढकललेला बरा. आरोग्य सामान्य राहील.
सिंह : कामात यश मिळेल. अधिकाऱ्यांची दखल घेतली जाईल. खर्च वाढण्याची शक्यता. बचतीकडे लक्ष द्या. आत्मविश्वास टिकवून ठेवा.
कन्या: कामाचा ताण वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. घरात गैरसमज टाळा. वडीलधाऱ्यांची साथ लाभेल. योगासने, ध्यान उपयुक्त ठरेल.
तूळ : नवीन संधी मिळू शकतात, व्यवसायात फायदा संभवतो. जोडीदाराशी संवाद सुधारेल. मानसिक समाधान मिळेल.
वृश्चिक : अचानक खर्च उद्भवू शकतो. कामात सावधगिरी ठेवा. भावनिक अस्थिरता जाणवेल. विश्रांती आवश्यक आहे. मित्र भेटतील.
धनु : प्रवासाचे योग आहेत. नवीन ओळखी होतील. शिक्षणात प्रगती होईल. दिवस उत्साहवर्धक आहे. आर्थिक प्रगती होईल.
मकर : कामात संयम ठेवा. आर्थिक नियोजन आवश्यक. घरातील जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्य ठीक राहील. सकारात्मक राहा.
कुंभ : नवीन कल्पनांना यश. मित्रांकडून मदत मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. मन आनंदी राहील. वरिष्ठ कौतुक करतील.
मीन : भावनिक निर्णय टाळा. कामात विलंब होईल. कुटुंबाचा आधार मिळेल. आत्मविश्वास वाढवा. सहलीचे नियोजन कराल.