Goddess Mahagauri: नवरात्रीचा आठवा दिवस: जाणून घ्या देवी महागौरीची पूजा, महिमा आणि धार्मिक महत्त्व

देवी महागौरीच्या उपासनेने संकटे दूर होतात, अशी धार्मिक मान्यता; जाणून घ्या स्वरूप, वाहन आणि पूजेचे महत्त्व
Mahagauri
MahagauriPudhari
Published on: 
Updated on: 

श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः। महगौरी शुभं दान्महादेवप्रमोददा।।

दर्गामातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दुःख त्याच्याजवळ कधीही येत नाही.

तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णतः गोरा आहे. या गोऱ्यापणाची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्षे मानले जाते, 'अष्टवर्षा भवेद् गौरी।' तिचे वस्र आणि आभूषणे देखील श्वेत रंगाची आहेत महागौरीला चार भुजा आहेत. वृषभतिचे वाहन आहे.

तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे. आपल्या पार्वतीरूपात तिने भगवान शंकराला पतीरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता

जन्म कोटि लगि रगर हमारी। बरॐ संभु न त रहॐ कुँआरी ।।

या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने अंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते.

देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकिक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news