

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आज ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढलेला राहील. महत्त्वाचा निर्णय घेताना घाई टाळा. कुटुंबीयांशी संवाद वाढेल. थकवा जाणवू शकतो.
वृषभ : जुनी अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधात संयम ठेवा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. आर्थिक वावतीत सावधगिरी बाळगा.
मकर: जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या समर्थपणे पार पाडाल. नोकरीत प्रगती होईल. मोठ्यांचा सल्ला लाभदायी ठरेल.
कर्क : कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. भावनिक निर्णय टाळा, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह : नेतृत्वगुण दिसून येतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य दिवस. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा
कन्या : कामात बारकावे लक्षात घेतल्यास यश मिळेल, व्यवसायात स्थिरता जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. पचनाचा त्रास होऊ शकतो.
तूळ : आज संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. भागीदारीत स्पष्टता ठेवा. कलात्मक गोष्टीमध्ये रस वाढेल. मानसिक शांततेसाठी वेळ काढा.
वृश्चिक : गुप्त योजना यशस्वी होऊ शकतात. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कोणावरही अति विश्वास ठेवू नका. ध्यानामुळे तणाव कमी होईल.
धनुः प्रवासाचे योग. नवीन ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल, धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन लागेल. आरोग्य सामान्य राहील.
मकर: जबाबदाऱ्या वाढतील. पण यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्य स्थिर राहील. धैर्य आणि चिकाटी आवश्यक आहे.
कुंभ : नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी उत्तम दिवस. मित्रांचे सहकार्य मिळेल, सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. आरोग्य सांभाळा.
मीन : संवेदनशीलता वाढेल, कलात्मक किंवा सर्जनशील कामात यश मिळेल. आर्थिक निर्णय सावधपणे घ्या. योग, प्राणायाम लाभदायी ठरेल.