

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर
मेष : श्रीगणेश सांगतात की, आज नवीन संधी मिळतील. आजचा दिवस तुमच्या कामासाठी खास असेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनातील पेच सुटतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
वृषभ : श्रीगणेश म्हणतात की, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. सकारात्मक विचार करा. कामाचा ताण जाणवेल. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत स्पष्टपणे बोलले पाहिजे.
मिथुन : गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे, असे श्रीगणेश सांगतात. कोणाशीही वादविवाद टाळा. अपेक्षित निकालासाठी विद्यार्थाना कठोर परिश्रम करावे लागतील.पती-पत्नीमधील नाते समजूतदारपणामुळे अधिक मधुर होईल. तुम्ही एकमेकांशी चांगला संवाद साधाल.
कर्क : आज आर्थिक प्रगती होईल. तुमच्या सर्व समस्या संपुष्टात येतील, परंतु तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सूचना श्रीगणेश करतात. भूतकाळातील चुका तुमची मानसिक शांतता बिघडवू शकतात. आज महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे टाळा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
सिंह : आज नातेसंबंध सुधारण्यावर तुम्ही भर देणे आवश्यक आहे. अनपेक्षित स्त्रोतांकडून आर्थिक लाभ संभवतो, असे श्रीगणेश सांगतात. मात्र वडिलोपार्जित मालमत्तेवरून कुटुंबातील सदस्याशी वाद होण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जाईल. दाम्पत्यांसाठी आजचा दिवस आनंदी असेल.
कन्या : करिअरच्या संधी, जीवनशैली आणि संपत्तीबाबत आजचा दिवस चांगला आहे. हे सर्व तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यास मदत करेल. आज तुमच्या नात्यात काही चढउतार येऊ शकतात. एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा, असे श्रीगणेश सांगतात.
तूळ : श्रीगणेश सांगतात की, आज तुमच्या संपर्कक्षेत्रात वाढ होईल. नोकरी बदलाचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ नाही. संयम ठेवा. पती-पत्नीमध्ये मतभेद होतील.
वृश्चिक : आजचा दिवस अनुकूल आहे. समारंभ आणि नातेवाईकांच्या भेटीमुळे घरातील वातावरण आनंद राहिल. तुम्हाला मानसिक शांती लाभेल, असे श्रीगणेश सांगतात. तुम्ही तुमच्या जीवनात स्थिरता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यात व्यस्त असाल. तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल.
धनु : श्रगणेश म्हणतात की, तुम्हाला यश मिळेल. समस्या सुटतील. व्यवसाय विस्तारासाठी ही योग्य वेळ आहे. पैसे कमावण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या शॉर्टकटमध्ये अडकू नये. तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा वाद होऊ शकतो. शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जोडीदाराला सरप्राईज देवून आनंदी ठेवू शकता.
मकर : आजचा दिवस खूप छान आहे. तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल आणि सकारात्मकतेचा प्रवाह तुम्हाला काही गंभीर कामे करण्यास अनुमती देईल. तुमच्या सर्जनशील कल्पना आणि आवेश तुमच्या आजूबाजूच्या लोकांना प्रेरित करू शकतात. कौटुंबिक आघाडीवर सावध राहण्याची गरज आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे टाळा, असा सल्ला श्रीगणेश देतात.
कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही व्यावसायिक आघाडीवर चमकाल; परंतु कौटुंबिक आघाडीवर काही त्रास संभवतो. व्यस्त कामातून कुटुंबासाठी थोडा वेळ द्या. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.
मीन : आज कर्मचारी वर्गाला मेहनतीचे फळ मिळेल. बढतीचे योग आहेत. अति कामामुळे कुटुंबासाठी वेळ देता येणार नाही. पती-पत्नीने वादविवाद टाळावा. आज गोष्टी सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करा, अशी सूचना श्रीगणेश करतात. काही महत्त्वाची कामे तुम्हाला व्यावसायिक आघाडीवर व्यस्त ठेवतील.