Annual Horoscope 2025 |मिथुन | वर्षाचा उत्तरार्ध यशदायक

या राशीच्या व्यक्तीकडे निसर्गत:च उत्तम ग्रहणशक्ती आहे
Daily Horoscope
मिथुनFile Photo
Published on
Updated on

आपणाकडे निसर्गत:च उत्तम ग्रहणशक्ती आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता आहे. पांडित्य आहे. तीव्र स्मरणशक्ती आहे. ज्ञान साधनेकरिता आपला जन्म असतो. वाचन, चिंतन, मनन, संशोधन, व्यासंग याबद्दल आपली ख्याती असते. आपल्याकडे शोधकपणा असतो. प्रसंगावधान, समयसूचकता, हजरजबाबीपणा, चातुर्य, नर्मविनोद, हसत-हसत दुसर्‍यावर टीका करण्याची सवय असते. ही सर्व उत्तम वकिलाला लागणारी गुण वैशिष्ट्ये आपणाकडे असतात.

आरोग्य

मिथुन राशीच्या व्यक्तींना दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025 गुरू या ग्रहाची अनुकूलता मिळणार नाही. मात्र, वर्षाच्या उत्तरार्धात गुरू पहिल्या स्थानात येईल. तेव्हा वर्षाच्या उत्तरार्धात गुरू अनुकूल ठरेल. तसेच जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत शनीची बाराव्या स्थानावर द़ृष्टी आहे. मात्र, खालील कालखंडात आरोग्य चांगले राहील.

आरोग्याच्या द़ृष्टीने चांगले कालखंड.

दि. 01/01/2025 ते दि. 24/01/2025

दि. 12/02/2025 ते दि. 05/05/2025

दि. 06/06/2025 ते दि. 24/10/2025

दि. 24/11/2025 ते दि. 05/12/2025

व्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती

व्यापार, व्यवसाय, व्यवसायात वाढ, आर्थिक लाभ, उधारी, उसनवारी वसूल होणे या द़ृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना वर्षभर शनी अनुकूल आहे व राहूही अनुकूल आहे. मात्र, गुरू हा दि. 18/05/2025 पासून अनुकूल आहे. त्यामुळे आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने दि. 14/05/2025 नंतरचा कालखंड चांगला आहे. वर्षाच्या आरंभापासून व्यवसायात वाढ होईल. विशेषत:, प्रिंटिंग प्रेस, कॅटरिंग, हॉटेल, खाद्यपदार्थ, मिठाई, साखर, तांदूळ, कापड व अनेक फूड प्रॉडक्टस् या व्यवसायांमध्ये वाढ होईल. दि. 28/01/2025 पासून ते दि. 29/06/2025 पर्यंत व्यवसाय वाढणार आहे. मात्र, काही कारणांमुळे अनपेक्षित खर्चही वाढणार आहेत.

आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड.

दि. 01/01/2025 ते दि. 29/06/2025

दि. 26/07/2025 ते दि. 20/08/2025

दि. 02/10/2025 ते दि. 24/10/2025

दि. 02/11/2025 ते दि. 26/11/2025

नोकरी

नोकरीतील व्यक्तींना दि. 01/01/2025 ते दि. 29/03/2025 या कालखंडात नवीन हितसंबंध निर्माण होतील. काही चांगल्या घटना घडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. दि. 01/04/2025 ते दि. 31/12/2025 या कालखंडात जबाबदार्‍या वाढणार आहेत, कामाचा ताण पडणार आहे. दि. 01/04/2025 नंतरच्या कालखंडात बदलीची शक्यता आहे. विशेषत:, 28/07/2025 ते दि. 13/09/2025 या कालखंडात बदलीची शक्यता आहे. बढतीच्या द़ृष्टीने खालील कालखंड चांगला आहे. दि. 29/05/2025 ते दि. 31/12/2025 या काळात बढतीचे योग आहेत.

नोकरीत अधिक चांगला कालखंड.

दि. 13/04/2025 ते दि. 14/05/2025

दि. 16/07/2025 ते दि. 16/09/2025

दि. 15/12/2025 ते दि. 31/12/2025

प्रॉपर्टी

प्रॉपर्टी, गुंतवणूक, गाडी, बंगला व वाहन खरेदीसाठी खालील कालखंड अनुकूल आहेत.

दि. 28/01/2025 ते दि. 27/07/2025

संततिसौख्य

संततिसौख्य, मुलामुलींची प्रगती, त्यांचे शाळा, कॉलेजमधील निकाल, नोकरी, व्यवसायाचे प्रश्न या द़ृष्टीने दि. 14/05/2025 नंतरचा कालखंड चांगला आहे. असे जरी असले, तरी यावर्षी सुरुवातीला शुक्र काही महिने अनुकूल असणार आहे. त्यामुळे गुरू जरी बाराव्या स्थानात असला, तरी शुक्र या ग्रहाचा फायदा संततिसौख्यासाठी होऊ शकतो.

संततिसौख्यासाठी चांगला कालखंड.

दि. 28/01/2025 ते दि. 29/06/2025

दि. 27/07/2025 ते दि. 14/09/2025

दि. 02/10/2025 ते दि. 24/10/2025

दि. 02/11/2025 ते दि. 26/11/2025

वैवाहिक सौख्य

मिथुन राशीच्या विवाहेच्छु मुला-मुलींना साखरपुडा, विवाह होणे या द़ृष्टीने व शुभ कार्याच्या द़ृष्टीने दि. 14/05/2025 नंतरचा कालखंड अनुकूल आहे. दि. 14/05/2025 पूर्वीचा कालखंड हा शुभ कार्याच्या द़ृष्टीने अनुकूल नाही. यावर्षी दि. 29/03/2025 रोजी शनी दहाव्या स्थानात जात असल्यामुळे दि. 29/03/2025 नंतरचा कालखंड हा वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल आहे. ज्यांच्या वैवाहिक जीवनात अगोदरचेच मतभेद आहेत, ते मतभेद दि. 29/03/2025 नंतर वाढणार आहेत. दि. 14/05/2025 नंतर गुरू जरी अनुकूल असला तरी दि. 29/03/2025 नंतर वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना शनी प्रतिकूल आहे. तेव्हा ज्यांच्या वैवाहिक जीवनात मूळचेच मतभेद आहेत ते मतभेद आता वाढीला लागणार आहेत. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींनी दाम्पत्य जीवनामध्ये संयम, शांतपणे, विवेक, धीर धरणे व एकमेकांचे विचार समजावून घेण्याची अधिक गरज आहे.

वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने अनुकूल कालखंड

दि. 31/05/2025 ते दि. 29/06/2025

दि. 02/11/2025 ते दि. 26/11/2025

दि. 20/12/2025 ते दि. 31/12/2025

प्रवास

प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास यासाठी

दि. 15/05/2025 नंतरचा कालखंड चांगला आहे. दि. 14/05/2025 नंतरच्या कालखंडात तीर्थयात्रेचे, परदेश प्रवासाचे योग येतील. सामान्यत: खालील कालखंड प्रवासाला चांगले ठरतील.

प्रवासाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड.

दि. 01/01/2025 ते दि. 28/01/2025

दि. 12/02/2025 ते दि. 13/03/2025

दि. 06/06/2025 ते दि. 08/07/2025

दि. 14/09/2025 ते दि. 09/10/2025

दि. 02/11/2025 ते दि. 26/11/2025

दि. 05/12/2025 ते दि. 23/12/2025

सुसंधी

सुसंधी, प्रसिद्धी, हाती घेतलेल्या कामात यश या द़ृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना दि. 14/05/2025 नंतरचा कालखंड अधिक चांगला आहे. परंतु, यावर्षी शुक्र हा ग्रह दि. 28/01/2025 ते दि. 31/05/2025 या कालखंडात मीन राशीत राहणार असल्यामुळे या कालखंडात गुरू जरी अनुकूल नसला तरी शुक्र अनुकूल आहे. त्याचा फायदा कला, संगीत, नाट्य, अभिनय या क्षेत्रात होईल.

खालील कालखंड सुसंधी, प्र्रसिद्धीसाठी अनुकूल

दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025

दि. 06/06/2025 ते दि. 30/08/2025

दि. 15/09/2025 ते दि. 24/10/2025

दि. 02/11/2025 ते दि. 26/11/2025

प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता

सामाजिक, राजकीय, सार्वजनिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, बँकिंग, सहकार या क्षेत्रांत प्रतिष्ठा मिळण्याच्या द़ृष्टीने दि. 14/05/2025 नंतरचा कालखंड चांगला आहे. मात्र, मानसन्मान, नावलौकिक, अधिकार या द़ृष्टीने

दि. 18/10/2025 ते दि. 05/12/2025 हा कालखंड विशेष चांगला आहे.

मान, प्रतिष्ठेसाठी चांगला कालखंड.

दि. 15/06/2025 ते दि. 15/07/2025

दि. 18/10/2025 ते दि. 05/12/2025

सारांश : हे वर्ष मिथुन राशीच्या व्यक्तींना समाधानकारक ठरणार आहे. सामान्यत: व्यवसायात प्रगती राहील. शैक्षणिक क्षेत्रात, संगीताच्या क्षेत्रात, कलेच्या क्षेत्रात व विद्यार्थ्यांना दि. 14/05/2025 नंतरचा कालखंड चांगला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news