Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, १६ एप्रिल २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, १६ एप्रिल २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष: श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही काहीतरी विशेष साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. घरबसल्या काही खरेदी करणेही शक्य आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीला अडचणीत मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. नकारात्मक कामांत गुंतलेल्‍या लोकांपासून दूर रहा. अचानक काही खर्चाचे प्रसंग उद्‍भवतील. अशावेळी कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा सल्‍ला घेवूनच निर्णय घ्‍या. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहिल.

वृषभ: आज तुम्ही घेतलेला महत्त्वाचा निर्णय योग्‍य ठरेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्यही लाभदायक ठरेल. मात्र अतिआत्मविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो. परिस्थिती शांतपणे हाताळा. संवाद साधताना नकारात्मक शब्द वापरू नका. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल नाही, अशी सूचना श्रीगणेश करतात. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. कुटुंबासाठी वेळ काढणे महत्त्वाचे ठरेल.

मिथुन : आज कोणतेही काम शांतपणे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सर्व कामे योग्य प्रकारे पूर्ण होतील. तुमची संतुलित विचारसरणी तुम्हाला समस्या सोडवण्यास मदत करेल, असे श्रीगणेश सांगतात. अतिविचार टाळा. अहंकारी असणे किंवा स्वतःला श्रेष्ठ समजणे नुकसानकारक ठरेल. मार्केटिंगसाठी सर्वोत्तम वेळ आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

कर्क : आज आवडत्या कामांमध्ये चांगला वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्हाला मनःशांती लाभेल. विद्यार्थी अभ्यास आणि करिअरकडे पूर्ण लक्ष देतील. नकारात्मक विचार टाळा. संयम आणि चिकाटी ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा, असा सल्ला श्रीगणेश देतात.कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य राहील. कामात प्रगती होईल.

सिंह : महिलांसाठी आजचा दिवस विशेषतः आरामदायी असेल. नवीन योजना फायदेशीर ठरतील. अतिकामामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नकारात्मकतेला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका; वर्तमानात जगायला शिका, असे श्रीगणेश सांगतात. कोणतेही काम घाई न करता सहजतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कायम राहील. कामाचा ताण जास्त असल्याने कुटुंबासोबत वेळ घालवल्याने वातावरण प्रसन्न राहील. आरोग्य चांगले राहू शकते.

कन्या : आज ग्रहांची स्थिती अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दिनचर्येत सकारात्मक बदल होईल. सामाजिक कार्यातही तुमचा सहभाग असेल. मुलांच्या प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण होईल. आज कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. लक्षात ठेवा की आळस किंवा जास्त चर्चा केल्याने तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. व्यवसायात सुधारणा होऊ शकते. वैवाहिक जीवनात नाते मधुर होऊ शकते.

तूळ : भविष्यातील ध्येयांसाठी आज कठोर परिश्रम केल्याने यश मिळेल. कौटुंबिक बाबींमध्ये तुमचा निर्णय
सर्वोपरि असेल. भावंडांसोबतचे वाद टाळा. बाहेरील लोकांशी व्यवहार करताना काळजी घ्या. काही लोकच तुमचा स्वार्थासाठी वापर करू शकतात. त्‍यामुळे तुमच्या कामाच्या शैलीत काही बदल करावे लागतील, असे श्रीगणेश म्‍हणतात. जोडीदार आणि कुटुंबासोबत खरेदीत वेळ जाईल.

वृश्चिक: आज काही जुने मतभेद दूर होतील, असे श्रीगणेश सांगतात. मुलांशी संबंधित समस्येवर उपाय शोधल्यास आराम मिळेल. महत्त्वाच्या गोष्टी जतन करा. स्वप्नांच्या जगातून बाहेर पडा. वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यवसायात परिश्रम जास्त आणि नफा कमी अशी परिस्थिती उद्भवू शकते. जोडप्यांमध्ये योग्य सामंजस्य राहील.

धनु : श्रीगणेश म्हणतात की, आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. बदलासंदर्भात नियोजन करत असाल तर योग्य वेळ आहे. मित्रांसोबत सहलीचे नियोजन कराल. जुन्या आठवणी ताज्या होतील, असे श्रीगणेश सांगतात. इतरांच्या कामात ढवळाढवळ करु नका. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी वाद घालणे देखील घराच्या व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करेल. व्यवसायात आज काही अडथळे येऊ शकतात.

मकर : आज ग्रहमान अनुकूल आहे. मुलांवर जास्त बंधने घालू नका, त्यामुळे त्यांचे मनोबल कमी होऊ शकते. तुमच्यावर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडू देऊ नका. कार्यक्षेत्रात सर्व कामे स्वतः व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी कौटुंबिक वातावरण राखण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा.

कुंभ: श्रीगणेश सांगतात की, तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या कामामुळे तुम्हाला समाजात सन्मान मिळेल. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याचा गांभीर्याने विचार करा, यावेळी परिस्थिती अनुकूल आहे. सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करून तुम्ही स्वतःला दुखवू शकता. सध्याच्या व्यवसायासोबतच काही नवीन कामातही तुमची रुची वाढेल.

मीन: श्रीगणेश म्हणतात की, तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने संकटाचा सामना करू शकता. कोणत्याही प्रकल्पात यश न मिळाल्यास विद्यार्थी निराश होतील. घरामध्ये सुधारणा करण्यापूर्वी तुमच्या बजेटचा विचार करा. कामाचा ताण जास्त असल्याने घर आणि कुटुंबासाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. अतिकामाचा ताण घेवू नका.

Back to top button