Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य ५ ते ११ फेब्रुवारी २०२३ | पुढारी

Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य ५ ते ११ फेब्रुवारी २०२३

चिराग दारूवाला चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

राशिभविष्य

मेष : श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या भूतकाळाशी संबंधित काही चिंता वाटू शकतात. यामुळे नात्यात विनाकारण अडथळे येऊ शकतात. समस्यांना सामोरे जाताना चातुर्य वापरा. आरोग्‍याकडे दुर्लक्ष करु नका. योग्‍य उपचार फायदेशीर ठरतील. आर्थिक व्‍यवहारात शब्‍द पाळा. तुमचे विवेकपूर्ण आर्थिक व्यवस्थापन आणि सकारात्मक कृती तुम्हाला उत्तरार्धात हळूहळू प्रगती आणि समृद्धी मिळवू शकतात.

वृषभ

वृषभ : श्रीगणेश म्हणतात की, हा आठवडा तुम्हाला तुमच्या रोमँटिक जीवनात खूप आनंद देईल. विद्यार्थ्यांच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा होईल. त्‍यांना मोठ्या अपेक्षांचा सामना करावा लागेल, तरीही वातावरण सामान्यतः अनुकूल असेल. आरोग्यामध्ये चढ-उतार जाणवेल. पोटविकारामुळे अस्वस्थता जाणवेल.

राशिभविष्य

मिथुन: आठवड्यात आर्थिक लाभ मिळेल. व्यावसायिकांनी समवयस्कांचा सल्ला ऐकणे फायदेशीर ठरेल, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. वैवाहिक संबंधांसाठी हा आठवडा लाभदायक ठरणार नाही. जोडीदाराशी मतभेद टाळा. तुमचे विचार आणि भावना तुमच्या जोडीदाराला नेहमी कळवा. अनपेक्षित वैद्यकीय खर्च होऊ शकतो. गूढ विज्ञान तुमची आवड निर्माण करू शकते. विद्यार्थ्यांना यश लाभेल.

कर्क

कर्क : विविध क्षेत्रातील ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कराल. तुमचे आरोग्य सुधारेल. फक्त तुम्ही काय खाता याकडे लक्ष ठेवा. तुमच्या वजनावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे भविष्यात एक गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. जंक फूड कोणत्याही परिस्थितीत टाळल्यास तुमच्या फिटनेसला फायदा होईल, असे श्रीगणेश सांगतात.

सिंह

सिंह : नवीन उपक्रम सुरू करण्याची वेळ आली आहे. बर्‍याच काळापासून नात्‍यात असणार्‍या जोडप्‍यांना लग्‍नासाठी परवानगी घेऊ शकतात. या आठवड्याच्या सुरुवातीच्‍या दिवसांमध्‍ये एखादी चिंता तुम्‍हाला जाणवू शकते. मात्र आठवड्याच्‍या शेवटी अनकुलता जाणवेल, असे श्रीगणेश म्‍हणतात.

कन्या

कन्या: नकारात्मक विचार टाळत उत्साही राहण्‍याचा प्रयत्‍न करा. अनावश्यक वाद टाळा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. आठवड्यात नोकरी, पालकत्व किंवा प्रेमसंबंधांच्या तणावामुळे मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्‍याचे श्रीगणेश सांगतात. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. कुटुंबासाठी खर्च करा. मालमत्तेबाबत निर्णय घेण्यासाठी हा आठवडा सकारात्‍मक नाही.

तुळ

तूळ : श्रीगणेश म्‍हणतात की, या आठवड्यात तुमच्या नात्यात काही गैरसमज होऊ शकतात. तुमचे खर्च वाढू शकतात, परंतु तुम्हाला मागील गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.व्यवसाय वाढवण्यासाठी कर्जासाठी बँकेत अर्ज करू शकता.

राशिभविष्य

वृश्चिक: हा आठवडाआरोग्यदायी असेल. आठवड्यात मित्रांसोबत वेळ व्‍यतित कराल. वाहन चालवताना काळजी घ्‍या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. रिअल इस्टेट किंवा पूर्वीच्या गुंतवणुकीतून भरीव परतावा मिळू शकतो. करिअरबाबत अविचारीने निर्णय घेवू नका. ग्रहांची तुम्‍हडाला साथ लाभणार असल्‍याने नवीन संधी मिळेल, असे श्रीगणेश सांगतात.

राशिभविष्य

धनु : या आठवड्यात आपल्या दैनंदिन नित्‍यक्रम कायम ठेवण्‍याचा प्रयत्न करा. प्रकृती चांगली राहिल. तुमचा खर्च वाढत राहिल्यास तुमचे साप्ताहिक वित्त व्यवस्थापित करणे अधिक कठीण होऊ शकते. त्‍यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.,

राशिभविष्य

मकर: या आठवड्यात नकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करू शकता आणि निराशावादी दृष्टीकोन विकसित करू शकता. विचारांवर नियंत्रण ठेवून तुम्हाला कठीण परिस्थितीवर नियंत्रण ठेवायचे आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

कुंभ

कुंभ : नातेसंबंधांसाठी सामान्य आठवडा आहे. ताणतणाव, जास्त विचार आणि आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी योग्य आहार, विश्रांती, व्यायाम आणि ध्यान करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. तुमचे नियोजन महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे.

मीन

मीन: या आठवड्यात तुमचा जोडीदार तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. व्यायाम आणि योगाचा जीवनशैलीत समावेश करा. मनोरंजनाला वेळ द्‍या. या आठवड्यात तुम्हाला डोकेदुखी किंवा हात दुखत असल्यास आवश्यकतेनुसार विश्रांती घ्या. आपण स्वत: उपचार करू शकता. प्रवास घडेल, असे श्रीगणेश सांगतात.

Back to top button