डी मॅट अकौंट म्हणजे काय?

अनिल पाटील

पूर्वी आपले शेअर्स विकायचे किंवा ट्रान्सफर करण्यासाठी बराच कालावधी लागायचा व सदर व्यवहारामध्ये फसवणूकही मोठ्या प्रमाणात होत असे. सेबीच्या नियमानुसार ऑनलाईन खाते अंमलात आणले गेले, त्याला डी मॅट अकौंट म्हणतात. आपल्या डी मॅट खातेवरून जलदरीत्या शेअर्स ट्रान्स्फर व विक्री करू शकतो. सदर खाते अदृश्य स्वरूपात असलेने आपल्या खात्यातून शेअर्सची चोरी होत नाही. 2014 साली 1 कोटी 21 लाख डी मॅट खाती होती, ती सध्या आपल्या देशात दोन कोटी चौदा लाख डी मॅट खाती आहेत. लोकसंख्येच्या तुलनने ही संख्या फारच कमी आहे. पूर्वी एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतले की, ती कंपनी एक शेअर्स सर्टिफिकेट देते, ते सर्टिफिकेट दृश्य (भौतिक) स्वरूपात असे. 1996 साली सेबीच्या नियंत्रणानुसार ऑनलाईन डीपॉजटरी कंपनी स्थापन करून नोंदीची प्रक्रिया सुरू झाली. आपल्या देशात सी डी एस इल (उशपीींरश्र ऊळिेीळींरीू डशर्लीीळींळशी ङींव) व एन एस डी एल (छरींळेपरश्र ीशर्लीीळींळशी ऊशिेीळींरीू ङींव) अशा दोन डीपॉजटरी कंपन्या कार्यरत आहेत. वरील कंपन्यांचे अधिकृत एजंट त्यांना ऊशिेीळीेीूं रिीींळलळरिपीीं म्हणतात.  देशातील सर्व शेअर्सची नोंदणी व सांभाळ सदर कंपनीकडून केली जाते व ज्यावेळी शेअर्स होल्डर शेअर्स विक्री करतो त्यावेळी त्याच्या सूचनेनुसार शेअर्स उपलब्ध करण्याची कार्य या कंपनीकडून केली जाते. प्रत्येक गुंतवणूक दरांचे ऑनलाईन अकौंट म्हणजे डी मॅट अकौंट होय. सेबीकडे नोंदणी केलेल्या ब्रोकरच्याकडून डीपॉजटरीकडे खाते उघडले जाते. आपली के वाय सी सी ची पूर्तता करून ब्रोकरकडे डी मॅट खाते काढले जाते. जसे बँकेत बचत खाते काढले जाते तसे एकापेक्षा जास्त खाती काढू शकतो. आपले शेअर्स डी मॅट करून घेणे म्हणजे दृश्य स्वरूपात असलेले शेअर्स अदृश्य स्वरूपात करून घेणे होय. आपले सर्व शेअर्स इलेक्ट्रानिक फार्ममध्ये असतात. जसा काळ बदलतो आहे तसे भविष्यात प्रत्येकाला डी मॅट अकौंटची गरज भासणार आहे. या खातेवर फक्त शेअर्सच नाही सर्व म्युच्युअल फंड बाँड इत्यादी गोष्टी डी मॅट वर खरेदी विक्री करणे सोपे झाले आहे. कोठेही न जाता घरात बसून आपले गुंतवणूक हाताळता येते. आता बदलत्या काळाबरोबर मात्र नवीन टेक्नॉलॉजी वापर करून भरपूर फायदा मिळविण्याची संधी मिळत आहे. बदलत्या काळाबरोबर बदलू या व देशाबरोबर आपलीही प्रगती साधू या. 

(प्रवर्तक एस पी वेल्थ मॅनेजमेंट, कोल्हापूर)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news