

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक बाजारातील सुस्त संकेतांदरम्यान शेअर बाजारात बुधवारी (दि.२३) सुरुवातीलाच चढ- उतार दिसून आला. सकाळी ९.४० वाजता सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ घसरणीसह सपाट पातळीवर व्यवहार करत होते. सेन्सेक्स १५० अंकांनी घसरून ८०,०५० वर तर निफ्टी ५० निर्देशांक ६७ अंकांच्या घसरणीसह २४,४०० वर व्यवहार करत होता. पण त्यानंतर लगेच त्यात रिकव्हरी दिसून आली. सकाळी १० च्या सुमारास दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात परतले. परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत होत असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात दबाव दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर एनटीपीसी, पॉवर ग्रिड, एम अँड एम, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, टाटा स्टील हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले आहेत. तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया या शेअर्स तेजीत खुले झाले आहेत.
झोमेटॉचा शेअर्स आज सुरुवातीला शेअर्स (Zomato Share Price) १ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. श्रेत्रीय पातळीवर निफ्टी बँक, फायनान्सियल सर्व्हिसेस, एफएमसीजी, आयटी आणि मेटल निर्देशांक वाढीसह खुले झाले आहेत. तर ऑटो, फार्मा, पीएसयू बँक, रियल्टी, हेल्थकेअर, ऑईल आणि गॅसमध्ये घसरण दिसून येत आहेत.