Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला, नेमकं काय घडलं?

Stock Market Updates: जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली. सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्येही 150 अंकांची घसरण झाली.
Stock Market
Stock MarketPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक संकेत मिश्र असताना भारतीय बाजारात घसरण दिसून आली. सुरुवातीलाच BSE Sensex सुमारे 600 अंकांनी घसरला, तर Nifty 50 मध्येही जवळपास 150 अंकांची घसरण झाली. ऑटो आणि आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली, ज्यामुळे बाजारावर आणखी दबाव वाढला.

जागतिक स्तरावर पाहिलं तर परिस्थिती थोडी गुंतागुंतीची आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शस्त्र पुरवणाऱ्या देशांवर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जागतिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अमेरिका-इराण युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी इराणकडून त्याचे उल्लंघन झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे मिडल ईस्टमधील अस्थिरता अजूनही कायम आहे.

दरम्यान, GIFT Nifty सुमारे 70 अंकांनी घसरून 23,990 च्या आसपास ट्रेड करत होता. आशियाई बाजारातही दबाव दिसून आला. जपानचा निक्केई निर्देशांक घसरला, तर डाओ फ्युचर्समध्येही किंचित घसरण झाली. यामुळे भारतीय बाजाराची सुरुवात कमकुवत होण्याचे संकेत आधीच मिळाले होते.

मात्र, कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण ही दिलासादायक बाब ठरली. ब्रेंट क्रूडमध्ये जवळपास 13 टक्क्यांची घसरण होऊन तो 95 डॉलरच्या खाली आला होता. सध्या तो थोडा सावरत 98 डॉलरच्या आसपास आहे. WTI क्रूडमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिका सरकारने हॉर्मुज सामुद्रधुनी बंद होण्याच्या बातम्या फेक असल्याचे स्पष्ट केल्यामुळे पुरवठ्यावरील चिंता कमी झाली.

सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमध्ये मात्र सध्या घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या किंमतीत सुमारे 150 रुपयांची घसरण झाली, तर चांदीही स्थिर राहिली. यावरून सध्या गुंतवणूकदारांचा कल इक्विटी मार्केटकडे वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Stock Market
RBI Action: धक्कादायक! महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला RBIने ठोकले ताळे; ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) 2800 कोटी रुपयांची विक्री केली असली, तरी 25 दिवसांनंतर 4783 कोटी रुपयांची नेट खरेदी झाली आहे. दुसरीकडे, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग 28व्या दिवशी 4200 कोटी रुपये बाजारात गुंतवले, ज्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळत आहे.

आजपासून Q4 निकाल सिझनलाही सुरुवात होत आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज TCS आपल्या निकालांची घोषणा करणार आहे. त्याचबरोबर Anand Rathi Wealth आणि GM Breweries यांचेही निकाल जाहीर होणार आहेत. या निकालांवरून बाजाराचा पुढील ट्रेंड ठरण्याची शक्यता आहे.

Stock Market
LPG Booking Update: LPG बुकिंगमध्ये मोठा बदल; सरकारचा ग्राहकांना इशारा, फक्त ओळखपत्रावर मिळणार...

दरम्यान, देशातील राजकीय घडामोडीही बाजारावर परिणाम करू शकतात. आज आसाम, केरळ आणि पुडुचेरी येथे विधानसभा निवडणुका होत असून त्यावरही गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.

एकूणच, जागतिक तणाव, कच्च्या तेलातील चढ-उतार आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजारात अस्थिरता दिसत असली, तरी काही सकारात्मक संकेतही आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस बाजारासाठी निर्णायक ठरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news