

Stock Market Opening Bell
देशांतर्गत शेअर बाजारातील आज (दि. ५ मे) आठवड्याची सुरुवातीला तेजी दिसून आली. सेन्सेक्स सेन्सेक्स ३८६.९५ अंकांनी वाढून ८०,८८८.९४ वर पोहोचला. तर निफ्टी ११४.०५ अंकांनी वाढून २४,४६०.७५ वर उघडला.त्याच वेळी, रुपया ८४.५८ च्या तुलनेत ८४.४५/$ वर उघडला.दरम्यान, भारतीय बाजारांसाठी चांगले संकेत दिसत आहेत. सलग १२ व्या दिवशी 'एफआयआय' रोखीने खरेदी करताना दिसत आहेत.
आज सुरुवातीच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. ऑटो-आयटी ते फार्मा आणि रिअल्टी पर्यंत सुरुवातीच्या व्यवहारात इंडेक्समध्ये वाढ दिसून येत आहे. दरम्यान, शुक्रवारी अमेरिकेत जोरदार वाढ झाली. नॅस्डॅकने दीड टक्क्यांहून अधिक वाढ केली. दरम्यान, जूनपासून उत्पादन वाढवण्याच्या OPEC+ च्या निर्णयामुळे, कच्च्या तेलात ४% वाढ झाली.
मागील आठवड्यात एक टक्क्यांची वाढ दर्शवत निफ्टीने सप्ताहात हिरवा झेंडा फडकत ठेवला. डिफेन्स कंपन्या, ऑईल अँड गॅस, रिअॅल्टी आणि ऑटो शेअर्सनी ही तेजी घडवून आणली. पारस डिफेन्स (CMP Rs. 1347.80) २९ टक्के वाढल्यामुळे आणि त्याला माझगाव डॉकयार्ड (Rs. 3004.70) सव्वाअकरा टक्के वाढ, गार्डन रिच (Rs. 1879.60) साडेतेरा टक्के वाढ यांनी साथ दिली. क्रूड ऑईलचे दर एप्रिल २०२१ पासूनच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. सोन्याचा भाव सप्ताहात दोन टक्के कमी झाला. या दोन्ही बातम्या तेजीला पूरक आहेत. आय.टी., एनर्जी, फार्मा शेअर्सही तेजीच्या दिंडीत सामील झाले. मात्र, मेटल, एफएमसीजी, कंझ्यूमर ज्युरेबल्स शेअर्स घसरले. सोनाटा सॉफ्टवेअर, एव्हरेस्ट ऑरगॅनिक्स, सीएलएन एनर्जी हे शेअर्स सप्ताहात चमकून उठले. व्हर्लपूल, अतुल ऑटो, सीएट हे शेअर्सदेखील चांगले वधारले. मात्र, खराब निकालांमुळे तेजस नेटवर्क्स आणि एसडब्ल्यू सोलारे हे शेअर्स गडगडले.