'तेजी'चा पाऊस..! 'निफ्टी'चा सर्वकालीन उच्‍चांक,'सेन्‍सेक्‍स'मध्‍ये 316 अंकांची वाढ

जाणून घ्‍या आज शेअर बाजारात काय घडलं?
Indian stock market reached a new high
शेअर बाजारात आज निफ्‍टीने नवा उच्चांक गाठला. Pudhari File Photo
Published on
Updated on

आशियाई बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारातही सोमवारी (दि.८) काही प्रमाणात कमकुवत स्थिती दिसून आली होती. मात्र आज ( दि. ९ जुलै) देशांतर्गत शेअर बाजारात हिरव्या रंगात व्यवहार सुरू झाले. तेजीला उधाण आल्‍याने 'निफ्टी'ने पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला तर सेन्सेक्सनेही नवा उच्चांक गाठत प्रथमच ८०,३९६ च्या पातळीला स्‍पर्श केला. अखेर आज बाजार बंद हाेताना निफ्टी ११२ अंकांनी वाढून २४,४३३ वर बंद झाला. सेन्सेक्स ३९१ अंकांनी वाढून ८०,३५१ वर बंद झाला. निफ्टी बँक 143 अंकांनी वधारून ५२,५६८ वर बंद झाला. मारुती सुझुकी कंपनीच्‍या शेअर्सनी सर्वाधिक वाढ नोंदवली. तसेच औषध कंपन्‍यांचे शेअर्सही वधारले.

Closing Bell
आज ( दि. ९ जुलै) देशांतर्गत शेअर बाजारात हिरव्या रंगात व्यवहार सुरू झाले. BSE

आज बाजारात काय घडलं?

  • निफ्टीने 24,443 चा नवा उच्चांक गाठला

  • सेन्सेक्सने 80,397 च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला

  • मिड-स्मॉलकॅप शेअर्सची खरेदी

  • सलग दुसर्‍या दिवशी रेल्‍वे शेअर्स 'सुसाट'

  • तेल-वायू शेअर्समध्ये घसरण

  • बाजार विक्रमी उच्चांकासह बंद झाला

Pudhari

आशियाई बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारातही सोमवारी (दि.८) काही प्रमाणात कमकुवत स्थिती दिसून आली होती. सेन्सेक्स ३६ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७९,९६० वर तर निफ्टी २४,३२० वर बंद झाला होते.आज व्‍यवहाराची सुरुवात होताच सेन्सेक्स 147 अंकांनी वाढून 80,107 वर उघडला. निफ्टी 31 अंकांनी वाढून 24,351 वर तर बँक निफ्टी 35 अंकांनी घसरून 52,390 वर उघडला. मारुती सुझुकी, ब्रिटानिया आघाडीवर होते. आणि एफएमसीजी शेअर्समध्ये आजही वाढ दिसून आली. आज दुपारी दोनच्या सुमारास सेन्सेक्स 387.51 अंकांनी वाढून 80,347.89 वर व्यवहार करत होता. निफ्टी 106.80 अंकांनीवाढून 24,427.30 वर दिसला. सुमारे 1754 शेअर्स वाढले. तर 1655 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 77 कंपन्‍याच्‍या शेअर्समध्‍ये कोणताही बदल झाला नाही.

निफ्टीने गाठला सर्वकालीन उच्‍चांक

निफ्टीने आज पुन्हा एकदा नवीन विक्रमी उच्चांक गाठला. निर्देशांक प्रथमच 24,401 च्या पुढे गेला आहे. आज बँक निफ्टी घसरणीने उघडला. पण नंतर कमबॅक केले. सेन्सेक्स 147 अंकांनी वाढून 80,107 वर उघडला. निफ्टी 31 अंकांनी वाढून 24,351 वर तर बँक निफ्टी 35 अंकांनी घसरून 52,390 वर उघडला.

निफ्टी टॉप गेनर्स...

निफ्टीमध्ये मारुती सुझुकी, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, सिप्ला, आयटीसी आणि कोटक महिंद्रा बँक प्रमुख वधारले. श्रीराम फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, बीपीसीएल आणि टेक महिंद्रा या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. निफ्टीच्या क्षेत्रीय निर्देशांकात वाढ दिसून आली. यासोबतच बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्समध्येही वाढ दिसून आली.

सलग दुसर्‍या दिवशी रेल्‍वे शेअर्स सुसाट, पण ....

रेल्‍वे विकास निगम लिमिटेड (आयव्‍हीएनएल)च्‍या शेअरर्समधील तेजी सलग दुसर्‍या दिवशीही कायम राहिली. आज ९ टक्क्यांहून अधिक उसळी घेत तो 620.00 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. मात्र, त्यानंतर शेअर्सच्या वाढीचा फायदा गुंतवणूकदारांनी घेतला त्यामुळे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. सध्या BSE वर 2.42 टक्क्यांच्या घसरणीही अनुभवली.

उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 827 कोटी रुपयांच्या रेल्‍वे विकास निगम लिमिटेड (आरव्‍हीएनएल ) चे 1.4 कोटी शेअर्सचे व्यवहार झाले. या अंतर्गत कंपनीच्या 0.7 टक्के होल्डिंगचा व्यवहार झाला. हा व्यवहार सरासरी 585 रुपये दराने झाला. रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्संनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या वर्षी 13 जुलै 2023 रोजी तो 117.35 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. या स्तरावरून, एका वर्षात 428 टक्क्यांहून अधिक वाढ होवून 9 जुलै रोजी इंट्रा-डे रु. 620.00 वर पोहोचली, ही या शेअर्ससाठी विक्रमी उच्च पातळी ठरली.

युपी सरकारची घोषणा आणि मारुती सुझुकीच्या शेअर्सने घेतली उसळी

मारुती सुझुकी इंडिया कंपनीच्‍या शेअर्सने आज सात टक्‍क्‍यांनी उसळी मारली. निफ्टी-50 निर्देशांकात सर्वात मोठा वाढ झाला. उत्तर प्रदेश सरकारने हायब्रीड कारवरील नोंदणी शुल्क माफ करण्याच्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने हायब्रिड इलेक्ट्रिक वाहने आणि प्लग-इन हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांसाठी नोंदणी शुल्कावर 100% पर्यंत सूट जाहीर केली आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या निवेदनानुसार, ग्राहकांना आता राज्यात हायब्रीड कार नोंदणीसाठी केवळ नाममात्र रक्कम भरावी लागेल. या सवलतीमुळे हायब्रीड कारच्या विक्रीला चालना मिळणार आहे. मारुती, होंडा, टोयोटा यांसारख्या हायब्रीड कार उत्पादक कंपन्यांसाठी हा निर्णय महत्त्‍वपूर्ण मानला जात आहे. 2024 च्या पहिल्या सहामाहीत, उत्तर प्रदेशातील प्रवासी वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 13.5% ने वाढून 2.36 लाख युनिट झाली आहे.

Closing Bell

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news