Stock Market | संघर्षातही बाजाराचा मंदीला नकार! 'या' शेअर्सकडे लक्ष ठेवा...

टाटा मोटर्समुळे निफ्टी ऑटो तेजीत राहिला. युद्धजन्य परिस्थितीत भारत फोर्जचा शेअर वाढणार हे ओघानेच आले.
Stock Market Rally
Stock Market (File Photo)
Published on
Updated on
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.
Summary

भारत-पाक युद्ध सुरू असताना निफ्टी आणि सेन्सेक्सची फक्त सव्वा टक्क्यांची घसरण.

टाटा मोटर्स, KPR Mill, RR Kabel आणि CCL शेअर्स तेजीत.

भारतीय सरकारी बँकांचे निकाल उत्कृष्ट; Asset Quality तही सुधारणा.

FII आणि DII ची सरासरी खरेदीत वाढ.

Stock Market Rally

भारत-पाकिस्तान संघर्षामुळे गत सप्ताहात बाजाराची भागती खंडित झाली. परंतु, बाजारातील घसरगुंडीच्या चिंतेपेक्षा दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याची जी अतुलनीय कामगिरी भारतीय लष्कराने केली. तिचा अभिमानच जास्त वाटावा, अशी परिस्थिती गुंतवणूकदारांनी अनुभवली. भूराजकीय संघर्ष (Geo-Political Tensions) हे कोणत्याही शेअर बाजाराच्या उलथापालथीला कारणीभूत होतात, हे आपल्याला माहीत आहेच, आणि इथे तर प्रत्यक्ष आपला देशच दहशतवादाविरुद्ध आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध लढतो आहे.

युद्ध प्रत्यक्ष सुरू असताना केवळ सव्वा टक्क्यांची घसरण, ही दोन बाबी अधोरेखित करते. पहिली म्हणजे भारतीय सैन्यावरचा आपला विश्वास आणि दुसरी भारतीय बाजारात येऊ घातलेली तेजी ! निफ्टी आणि सेन्सेक्स सव्वा टक्के तर निफ्टी बँक पावणेतीन टक्के घसरणीत हे बाजाराचे गत आठवड्यातील सर्वसाधारण चित्र. निफ्टी बैंक आणि स्मॉल कॅप शेअर्स थोडे-अधिक घसरले. त्यामानाने मिड कॅप शेअर्स कमी घसरले.

Stock Market Rally
अर्थभान : बाजाराची उसंत, सप्ताहात संथ कारभार

निफ्टी ऑटो आणि मीडिया शेअर्स ग्रीन झोनमध्ये राहिले. आय.टी. इंडेक्स फ्लॅट राहिला; मात्र रियल्टी, सरकारी बँका आणि फार्मा शेअर्सनी वातावरण खराब केले.

टाटा मोटर्समुळे निफ्टी ऑटो तेजीत राहिला. युद्धजन्य परिस्थितीत भारत फोर्जचा शेअर वाढणार हे ओघानेच आले. मदरसन आणि हिरो मोटोनेही चांगली कामगिरी केली.

Stock Market Rally
अर्थभान : ‘एआयएस’ करदात्यांसाठी महत्त्वाचे दस्तावेज, जाणून घ्‍या सविस्‍तर

खूप दिवसांनी टाटा मोटर्स ७०० रुपयांच्या वर आला. मागील एक महिन्यात हा शेअर २० टक्के वाढला आहे. कारण आपण वाचलेच असेल. कमर्शिअल व्हेईकल्स आणि प्राइव्हेट कार्स अशा दोन कंपन्या स्थापन करण्याचा टाटा ग्रुपचा निर्णय झाला आहे.

कमर्शिअल व्हेईकल्समध्ये टाटा मोटर्स भारतात अग्रगण्य आहे, तर इलेक्ट्रिक वाहनांमुळे पॅसेंजर व्हेईकल्सनाही मोठी मागणी आहे. १३ मे रोजी टाटा मोटर्स आपले चौथ्या तिमाहीचे आणि २०२४-२५ चे आर्थिक निकाल सादर करेल. बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे निकाल आले तर हा शेअर रॉकेट बनेल. आज तो केवळ ६.२२ पीईला मिळतो आहे.

Stock Market Rally
अर्थभान : चला, समजून घेऊ भांडवली बाजार

KPR mill (रु. १३०६.२५), RR Kabel (रु. १२३४.८०) आणि CCL (रु. ७२३.३५) ह्या शेअर्सनीही गेल्या सप्ताहात कमाल केली. बांगला देशवर अमेरिकेच्या टॅरिफ वाढीचा आघात झाला आणि भारतीय टेक्स्टाईल कंपन्यांचे भवितव्य एकदम प्रकाशमान झाले. KPR Mill च्या तेजीमागचे हे कारण होते.

RR Kabel ही घरगुती आणि औद्योगिक वायर्स आणि केबल्स बनविणारी उत्कृष्ट कंपनी आहे. चौथ्या तिमाहीचे तिचे आर्थिक निकाल उत्तम आहेत. निव्वळ नफ्यात ६४ टक्के वाढ, तर उत्पन्नात साडेसव्वीस टक्के वाढ. शेअरचा ५२ Week High आहे रु. १९०३ आणि आजचा भाव आहे रु. १२३५. गुंतवणूकदारांनी अवश्य विचार करावा, असा हा शेअर आहे.

कॉफी बनविणारी कंपनी गेल्या आठवड्यात एकदम Hot बनली ती केवळ दोन दिवसांत ३० टक्के वाढल्यामुळे. CCL Products ही कंपनी कॉफीचे उत्पादन, वितरण आणि विक्री करते. भारत व्हिएतनाम आणि स्वित्झर्लंडमध्ये तिचा व्यवसाय विस्तार आहे. लवकरच ती कॅनडा आणि युरोपमध्ये आपला विस्तार करणार आहे. चौथ्या तिमाहीच्या तिच्या दमदार आर्थिक निकालांमुळे सर्व अॅनालिस्टस्नीही तिची टारगेट प्राईस वाढविली आहे.

Bharat Seats, Sym-phony, Niva Bupa Health Insurance, Shriram Pistons, Shankara Building Products या शेअर्समधील व्हॅल्यूम ग्रोथ नजरेत भरणारी आहे. हे सर्व शेअर्स सध्या तेजी दर्शवत आहेत.

टायटन, एल & टी, डॉ. रेड्डीज हे शेअर्स बाजारातील दिग्गज शेअर्स आहेत. या तिन्ही कंपन्यांनी चौथ्या तिमाहीचे निकाल अतिशय दमदार दिले आहेत. जिंदाल स्टेनलेस, आरईसी, पोडीलाईट, दिलीप बिल्डकॉन या कंपन्यांनीही उत्तम निकाल दिले आहेत आणि ते बाजाराच्या तेजीला इथून पुढे हातभार लावतील. आर सिस्टीम्स ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, अॅनालिटीक्समधील ग्रोथ कंपनी आहे. चौथ्या तिमाहीत तिचा निव्वळ नफा चाळीस टक्क्यांनी वाढला आहे. प्रत्येक गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे असा हा शेअर आहे. ब्रिटानियाने बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगले निकाल दिले आहेत. महाराष्ट्र बैंक, बैंक ऑफ इंडिया, युनियन बैंक, कॅनरा बँक या सरकारी बँकांचे निकाल तर उत्कृष्ट आहेतच, शिवाय त्यांची Asset Quality देखील सुधारली आहे.

कोरोमंडलने (रु. २३४५) आपली तेजी सुरूच ठेवली आहे. सध्या तो त्याच्या ५२ Week High च्या जवळपास आहे. तीन हजारांकडे त्याची वाटचाल सुरू आहे. जवळपास नऊ महिन्यांच्या Consolidation नंतर गोदरेज अॅग्रो वरची दिशा दाखविण्याचा प्रयत्न करतो आहे. येत्या सप्ताहात तो ७०० रुपयांच्या वर टिकून राहिला तर तोही चांगला गती पकडेल. Navin Fluorine चा शेअर चार्टवर उत्कृष्ट पॅटर्न दाखवत आहे. (सध्याचा भाव रु. ४५९५) हाही शेअर ५००० कडे वाटचाल करत आहे. Paradeep Phosphates (Rs. 141.90) ब्रेक आऊट दिलेला आहे आणि बघता बघता तो २०० चा टप्पा गाठेल, असे वाटते. जवळपास तीन वर्षे एका रेंजमध्ये अडकलेला SRF रेंजमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला आहे (रु. ३००४).

image-fallback
अर्थभान : कमी मूल्याच्या नोटा वाढल्याने व्यवहारांत वाढ

मनोरमा इंडस्ट्रीज हा शेअर तुम्हाला माहीत आहे का? बेकरी आणि कन्फेक्शनरी इंडस्ट्रीजना लागणारे बटर बनविणाऱ्या या कंपनीची ग्रोथ स्तिमीत करणारी आहे. मागील एका वर्षात हा शेअर १२५ टक्के वाढला आहे. चार्टबर सध्या Rounding Bottom दिसतो आहे. रु. १२९७ हा त्याचा आजचा भाव आहे. FII आणि DII त्याच्यातील आपला हिस्सा वाढवत आहेत.

शुक्रवारचा दिवस सोडला तर FII आणि DII यांची खरेदी दिवसेंदिवस वाढत आहे. भारताची प्रबळ क्षमता आणि पाकिस्तानची जर्जर अवस्था पाहता बाजारात मोठा धमाका स्पष्ट दिसतो आहे.

या सप्ताहात लक्ष ठेवण्यासारखे काही शेअर्स Railtel, Havells, Persistent, Tata Elxi.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news