

पुढारी ऑनलाईन डेस्क : जोरदार विक्रीनंतर आज सेन्सेक्स १४७ अंकांनी वाढून ७४,६०२ वर तर निफ्टी ६ अंकांनी घसरून २२५४८ वर बंद झाला. बँक निफ्टी देखील ४३ अंकांनी घसरून ४८६०८ वर बंद झाला.
आज बाजारात व्यवहारांची सुरुवात होताच सेन्सेक्स १४ अंकांनी घसरून ७४,४४० वर आणि निफ्टी ३७ अंकांनी घसरून २२,५१६ वर उघडला. आज सुमारे १६१२ कंपन्याचे शेअर्स वधारले तर २१६६ घसरले आणि १२७ जैसे-थे राहिले. निफ्टीमध्ये एम अँड एम, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी आणि नेस्ले हे सर्वाधिक वाढलेले शेअर होते. तर हिंडाल्को, डॉ. रेड्डीज लॅब्स, सन फार्मा, हिरो मोटोकॉर्प आणि ट्रेंट हे सर्वात जास्त तोट्यात होते. बाजार बंद होताना निफ्टी लाल तर सेन्सेक्स हिरव्या चिन्हावर बंद झाला.
आयटी, धातू, तेल-वायू, ऊर्जा, भांडवली वस्तू, सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि रिअल्टी ०.५-१ टक्क्यांनी घसरले, तर ऑटो, ग्राहकोपयोगी वस्तू, एफएमसीजी, टेलिकॉम ०.५ टक्क्यांनी वधारले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.
रुपया ५२ पैशांनी कमकुवत होत ८७.२१ डॉलरवर बंद झाला आहे. आज सकाळी तो १५ पैशांनी कमकुवत होऊन ८६.८५/$ वर उघडला होता. आज निफ्टी ऑटो, एफएमसीजी आणि ऑटो सेक्टरमध्ये वाढ दिसून आली. तर निफ्टी फार्मा, मेटल आणि आयटी क्षेत्रांवर दबाव होता. आज निफ्टीच्या रिअल्टी निर्देशांकात सर्वाधिक विक्री दिसून आली.