Stock Market Closing Bell | शेअर बाजारात घसरण; सेंसेक्स 247 अंकांनी तर निफ्टीमध्ये 68 अंकांची घट

Stock Market Closing Bell | शेअर बाजारात IT शेअर्सवर दबाव, बँकिंग व रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी
Stock Market Closing Updates
Stock Market Closing Updates (File photo)
Published on
Updated on

Stock Market Closing bell July 14th 2025

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेंसेक्स 247 अंकांनी घसरून 82,253 वर बंद झाला, तर निफ्टी 68 अंकांनी घसरून 25,082 वर स्थिरावला. IT क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव होता, परंतु बँकिंग आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले.

सेंसेक्स आणि निफ्टीची स्थिती

  • सेंसेक्समधील 30 पैकी 20 शेअर्स घसरले.

  • इन्फोसिस, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स 2 टक्क्यांपर्यंत घसरले.

  • टायटन, महिंद्रा आणि इतर काही शेअर्समध्ये सौम्य तेजी पाहायला मिळाली.

  • निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 27 शेअर्स घसरले, 22 वर गेले आणि 1 शेअर स्थिर राहिला.

  • NSE IT इंडेक्समध्ये सर्वाधिक 1.11 टक्क्यांनी घसरण झाली.

  • मीडिया, फार्मा, बँकिंग, रिअल्टी, हेल्थकेअर आणि FMCG क्षेत्रात तेजी दिसून आली.

Stock Market Closing Updates
Gautam Adani healthcare: अदानींची वैद्यकीय क्षेत्रात एंट्री; 60,000 कोटींची गुंतवणूक, मुंबई-अहमदाबादेत 'हेल्थकेअर टेम्पल्स'

स्मार्टवर्क्स IPO – शेवटचा दिवस

स्मार्टवर्क्स कंपनीचा IPO आज (14 जुलै) संपत आहे. आतापर्यंत हा इश्यू 1.2 पट सबस्क्राइब झाला आहे. 583 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे आणि हे पैसे कंपनीचा विस्तार व कर्जफेडीसाठी वापरण्यात येणार आहेत.

स्मार्टवर्क्स ही देशातील सर्वात मोठी ‘मॅनेज्ड कॅम्पस ऑपरेटर’ आहे. एक कोटी चौरस फूट कमर्शियल स्पेसचे व्यवस्थापन करते. Google, Groww, MakeMyTrip, L&T, Bridgestone, Philips Global यांसारख्या 700 पेक्षा जास्त क्लायंट्स आहेत.

जागतिक बाजारात संमिश्र व्यवहार

  • जपानचा निक्केई निर्देशांक : 0.28 टक्क्यांनी घसरून 39460 वर

  • कोरियाचा कोस्पी: 0.83 टक्क्यांनी वाढून 3202 वर

  • हॉंगकॉंगचा हँगसेंग: 0.26 टक्क्यांनी वाढून 24203 वर

  • चीनचा शांघाय कंपोजिट: 0.27 टक्क्यांनी वाढून 3520 वर

Stock Market Closing Updates
VIP Industries shares | प्रमोटर्स १५ टक्के स्वस्त किमतीत विकताहेत हिस्सा, शेअर्स ५ टक्के घसरला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ

दरम्यान, 11 जुलै (शुक्रवार) रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. सेंसेक्स 690 अंकांनी घसरून 82,500 वर निफ्टी 205 अंकांनी घसरून 25,150 वर बंद झाला होता.

अमेरिकन बाजारातही 11 जुलै रोजी डाऊ जोन्स: 0.6 टक्के घसरण दिसून आली होती. तर नॅस्डॅक कंपोजिट: 0.22 टक्के घसरण आणि S&P 500: 0.33 टक्के घसरण झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news